आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!

*आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!**शहादा पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार;पोलीस अधिकारी व कर्मचारी गैरहजर!**अर्ज स्वीकारले जात नसल्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!*शहादा: पोलीस ठाणे शहादा येथे संघटनेचे अर्ज,निवेदन, तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केले जात असल्याबाबत व आदिवासी कार्यकर्त्यांस तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याबाबतची तक्रार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस अधीक्षक नंदूरबार व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही बिरसा फायटर्सचे पदाधिकारी दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस ठाणे शहादा येथे मौजे वडगांव ता.शहादा येथील वनदावे निकाली काढण्यासंदर्भात मा.उपविभागीय अधिकारी,शहादा कार्यालय समोर २० डिसेंबर २०२३ रोजी ठिय्या आंदोलनास परवानगी मिळणेबाबतचे निवेदन द्यायला गेलो.तेव्हा पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या पोलिसांनी “तुम्ही आदिवासी आंघोळ करून आलेले नाहीत”, अशा अपमानास्पद शब्दांत तुच्छतेची वागणूक देत हिणवणूक केली.पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत साहेब, बाहेर गेले आहेत.त्यांची वाट बघत बसा. ते आल्यानंतर त्यांना अर्ज दाखवा.नंतर आम्ही घेऊ.ते असल्याशिवाय आम्ही कुठलेच अर्ज स्वीकारत नाहीत.असे सांगत निवेदन घेण्यास टाळाटाळ करत स्वीकारले नाहीत.आम्ही अर्धा तासापासून थांबलो आहोत,निवेदन तरी घ्या व साहेब आल्यानंतर त्यांना दाखवा,अशी विनंती ठाणे अंमलदार व गुप्त विभागातील कार्यरत पोलिसांना केली.असे आवक अर्ज मी घेत नाही,मी फक्त गुन्हे नोंद करतो.मी तुमचा अर्ज घेऊ शकत नाही.आवक जावक अर्ज स्वीकारणेही पोलीस ठाण्यात नाहीत, ते सुद्धा बाहेर गेले आहेत, कधी येतील सांगता येणार नाहीत, ते आल्यानंतर ते अर्ज घेतील. असे बोलत ठाणे अंमलदार यांनी अर्ज घेतला नाही.उलट तुम्ही आम्हाला अर्ज देताय म्हणून तुम्हाला आम्ही अटक करू,अशी धमकी देत संबंधित पोलिसांनी आम्हाला हात लावत जबरदस्ती केली.आमचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात बराच वेळ वाट बघत बसले.तरी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे आले नसल्यामुळे आमचा अर्ज घेतलाच नाही. महोदय, शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिस हे आपल्या पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक आमच्या बिरसा फायटर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांस तुच्छतेची वागणूक देत अटक करण्याची धमकी,दमदाटी देत वेठीस धरत आहेत. यापूर्वी सुद्धा बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांना दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १२ ते १ वाजेदरम्यान कुणाच्या तरी सांगण्यावरून अचानक मलगांव येथील राहत्या घरातून उचलून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.तसेच शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित कार्यरत पोलीस हे सामान्य माणसांची,आदिवासी सरपंच महिलेची,संघटनांची तक्रार अर्ज व निवेदन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत स्वीकारत नाहीत, गुन्हा सुद्धा नोंद करीत नाहीत,असे आम्हाला अनेकदा दिसत आहे.सामान्य लोकांचे तक्रार अर्ज स्वीकारले जात नाहीत,गुन्हे नोंद करण्यात येत नाहीत, टाळाटाळ केली जाते.फिर्यादीलाच आरोपीसारखी अपमानास्पद वागणूक दिली जाते.पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी हे ठाण्यात अनेकदा गैरहजर असल्याचेच दिसते.त्यामुळे शहादा पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. तरी शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांवर योग्य ती कार्यवाही करून सामान्य माणसाचे,संघटनेचे निवेदन, तक्रार अर्ज स्वीकारण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस अधीक्षक नंदूरबार व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!