शिंदखेडा तालुक्यात निशाने-महाळपुर रस्त्यावर वन विभागाद्वारे धडक कारवाई, एकूण 4 लाख 29 हाजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

शिंदखेडा तालुक्यात निशाने-महाळपुर रस्त्यावर वन विभागाद्वारे धडक कारवाई, एकूण 4 लाख 29 हाजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

शिंदखेडा – तालुक्यातील निशाने महाळपुर रस्त्यावर गुरुवारी वनविभागाने विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त केले असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे येथील वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे आशुतोष बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एन व्ही साठे एनबी पाटील अश्विनी पाटील व स्टाफ यांनी दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी शिंदखेडा तालुक्यातील साळवे नियत क्षेत्रातील निशाने- महाळपुर रस्त्यावर गस्त करीत असता धडक कारवाई करत नीम प्रजातीच्या जळाऊ लाकडाने भरलेली टाटा आयशर क्रमांक MH 04 EY 2449 गाडी विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आली.सदर टाटा आयशर ची तपासणी केली असता त्यात 29 हजार 250 रुपयांचा नीम प्रजातीचे जळाऊ लाकूड हस्तगत करण्यात आले.
आयशर क्रमांक MH 04 EY 2449 अंदाजे किंमत 4 लाख व 29 हजार 250 रुपये किमतीचे लाकूड असे एकूण 04 लाख 29 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीसह जप्त करण्यात आला आहे.सदर जप्त करण्यात आलेले निम प्रजातीचे लाकूड 19.50 घनमीटर इतके असून 06 घनमीटर गाडीत तर 13.50 घनमीटर लाकूड जागेवर जप्त करण्यात आले असल्याची माहिती दक्षता पथकाचे प्रमुख आशुतोष बच्छाव यांनी दिली.
सदर गुन्ह्याची नोंद भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 52(1) महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 31 चे उल्लंघन केले असल्याची अनुसार महाळपुर शिवारात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!