वनदावे मार्गी लावा: बिरसा फायटर्सची मागणी**उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*

*वनदावे मार्गी लावा: बिरसा फायटर्सची मागणी**उपविभागीय अधिकारी यांना निवेदन* शहादा: शहादा तालुक्यातील वडगाव येथील २०१८ मधील २६९ व नंतरचे ७५ अपिलीय वनदावे मार्गी लावावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,मौजे वडगांव ता.शहादा जि.नंदुरबार येथील सन २०१८ मध्ये २६९ वनदावे मा.तहसीलदार, तहसील कार्यालय शहादा येथे मंजूरीसाठी सादर करण्यात आलेले होते.तसेच ७५ अपिलीय वनदावे मा.उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा येथे दाखल करण्यात आलेले आहे. परंतु त्या अर्जांवर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही,अपिलीय अर्जावर सुद्भा अद्याप सुनावणी झालेली नाही.त्या आशयाचे प्रमाणपत्र सुद्धा वनदावेदारांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधित वनहक्क समितीने अर्जदारांना तोंडी व लेखी पत्र दिलेले आहे.तरी सदरचे मंजूरीसाठी सादर करण्यात आलेले २६९ वनदावे व ७५ अपिलीय दावे निकाली काढण्यात यावेत.या मागणीसाठी आम्ही आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक २०/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,राहुल चव्हाण, बिरबल पावरा,विशाल पावरा,करण पावरा आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!