मोकाट जनावर याचा बंदोबस्त कारण्याची मागणी- मनसे
शहादा शहरात मार्केट परिसरात ,कॉलनी परिसरात मोकाट गुर जनावरांचा वापर वाढला आहे त्या मुळे तालुक्यातील व शहरातील जनतेला विद्यार्थी महिला वर्गाला त्रास सहन करावा लागतो शहरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागते या मोकाट जनवरांमुळे मध्यंतरी शहरातील नागरिकांचा अपघात झाला तर याला जवाबदार कोण नगरपालिका कडून कुठलीही उपाययोजना नाही तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शहरातील मोकाट जनावरांचे उपाययोजना करून त्यांना नगरपालिकेच्या कोंढवाड्यात हलवावे यावर उपयोजना करून कार्यवाही कराल अशी अपेक्षा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पध्दतीने आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष श्री.भारत खैरनार,तालुका सचिव. श्री.अमेय राजहंस,शहर उपाध्यक्ष श्री.रोहित खैरनार,नंदू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.