भेलके महाविद्यालयातील ग्रंथालयात “शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रम

*भेलके महाविद्यालयातील ग्रंथालयात “शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रम* भारत सरकार च्या National Book Trust of India तर्फे पुण्यामध्ये दि.१४ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे “पुणे पुस्तक महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे तसेच वाचन संस्कृती जपणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमांबरोबरच एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम ” शांतता, पुणेकर वाचत आहेत” आपण जिथे असाल तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचन करणे हा उपक्रम शासनाने घेण्यास महाविद्यालयास कळविले होते. त्यानुसार शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे दि.१४ डिसेंबर २०२३ ठीक १२ ते १ वाजेपर्यंत महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये ” शांतता, पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला. सदर उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले वाचनाच्या साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर साहित्य उपलब्ध होते. उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शखाली केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!