जि. प. शाळा औरंगपूर येथे शैक्षणिक साहित्य किट वाटप

*जि. प. शाळा औरंगपूर येथे शैक्षणिक साहित्य किट वाटप* शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था* या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळा औरंगपूर ता. शहादा जि. नंदुरबार येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक साहित्य स्टेशनरी वह्या पेन, स्केच पेन, रंग खडू, पाटी, पेन्सिल, शोपनर, खोडरबर, चित्रकला वही इत्यादी स्टेशनरी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ.राजेश्वरी महीरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जि. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा पाया असतो. बाल वयातच शाळा व शिक्षणाविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे.म्हणून शासनाकडून विविध शालेय पोषक उपक्रम राबविले जातात. समाजाने देखील विद्यार्थ्यांना शालेय पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. थोर व्यक्तींचे चारित्र्य वाचल्याने प्रेरणा मिळते व जीवनाला नवीन वळण मिळते. यावेळी जि. प शाळा औरंगपूरचे मुख्याध्यापक श्री.देवरे सर यांनी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य किट वाटप केल्यामुळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि गावातील पदाधिकारी यांचे स्वागत व आभार मानले.पुढे श्री. देवरे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांना अशीच प्रेरणा गावातून मिळाली तर भविष्यात आपल्या दुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा अधिकारी होतील. व गावागावात आदर्श निर्माण होईल. कार्यक्रम प्रसंगीउपाध्यक्ष सौ. मीनाक्षी पाटील सचिव श्री.पंकज अहिरे खजिनदार श्री.प्रदीप पाटील सदस्य श्री.नागराज निकम औरंगपूर गावचे सरपंच श्री. एकनाथ वळवी उपसरपंच श्री. आनंदसिंग शेवाळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवढे सर, उपशिक्षक श्री बी.के.भोसले सर, उपशिक्षक वळवी सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव पंकज अहिरे यांनी केले. तर आभार बी.के.भोसले सर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!