सांगा सरपंच, ग्रामसेवक साहेब,वडगावचा रस्ता कधी होणार?**वडगाव गावात रस्ते बनवण्यास सरपंच व ग्रामसेवकाचे दुर्लक्ष!

*सांगा सरपंच, ग्रामसेवक साहेब,वडगावचा रस्ता कधी होणार?**वडगाव गावात रस्ते बनवण्यास सरपंच व ग्रामसेवकाचे दुर्लक्ष!*शहादा: वडगावमधील श्री.लगन दुलबा पावरा यांच्या घरापासून ते सौ.चिनकी गिरधर पावरा यांच्या घरापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करा,अशी मागणी बिरसा फायटर्सच्या गाव शाखा वडगांवच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे २४ जुलै २०२३ रोजी करण्यात आली होती. निवेदनात म्हटले होते की,आम्ही वडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत. ग्रामपंचायत वडगाव तर्फे शासनाच्या विविध योजनेतून वडगावला सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. परंतु श्री.लगन दुलबा पावरा यांच्या सौ.चिनकी गिरधर पावरा यांच्या घरापर्यंत रस्ता अद्याप बनविण्यात आला नाही.त्यामुळे आम्हाला दळणवळण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. शिवाय सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे पाणी साचून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे आम्हा रहिवाशांना सदर रस्त्यावरून येता जातांना आम्हा रहिवाशांना खूपच त्रास होत आहे. सदर रस्ता लवकरात लवकरात झाल्यास आम्हा रहिवाशांना व पादचा-यांना पायी येण्या जाण्याची,चार चाकी,दुचाकी वाहनाने येण्या जाण्याची सोय होईल व इतर अनेक अडचणी दूर होतील, म्हणून ग्रामपंचायत तर्फे लवकरात लवकर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून तयार करण्यात यावा. निवेदन देऊन ६ महिने लोटले तरी अद्याप हा रस्ता बनवला गेला नसल्यामुळे गावातील लोकांना व वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायतला सरकारकडून विकासकामांसाठी लाखो निधी दिला जातो. त्या निधीचा आवश्यक ठिकाणी योग्य वापर करून गावाचा विकास करायचा असतो.परंतु रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास सरपंच व ग्रामसेवक सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्या भुमिकेवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असून रस्ता न झाल्यास बिरसा फायटर्स वडगाव संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!