गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई करा : आर.पी.आय आंबेडकर गटाची मागणी…

*गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई करा : आर.पी.आय आंबेडकर गटाची मागणी…* धुळे जिल्ह्यातील गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्ह्यामधून गुटखा हद्दपार करा. आर पी आय आंबेडकर गटाची मागणी धुळे जिल्हात मध्यप्रदेश मधून गुटखा मागविणारे व धुळे जिल्हात सरासपणे प्रत्येक पान शॉप , किराणा शॉप , हॉटेल्स वर गुटखा पुरविणाऱ्या गुटखा किंग कोण याचा तपास लावून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्हा मधून गुटखा हद्दपार करा असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे जिल्हा अध्यक्ष दिनेश निकुंभ यांनी दिले धुळे शहरापासून मध्यप्रदेश व गुजरात या दोन्ही सीमा जवळ असल्यामुळे जिल्हात तस्करी चे प्रमाण वाढताना दिसून येते व त्या मुळे जिल्हात गुन्हेगारी चे प्रमाण वाढल्याने धुळे नवयुवक कमी वयात वाईट मार्गाला लागतात.महोदय आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात करोडो रूपयांचा गुटखा पकडून मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यात गुटखा , अवैध दारू मागविण्यात कोणाचा हात आहे. एवढा पैसा कोणता गुटखा किंग गुंतवणूक करतो याचा तपास कोणीच करताना दिसत नाही असा आरोप या निवेदनात केला आहे.धुळे जिल्ह्यात प्रत्येक पान शॉप, किराणा शॉप, हॉटेल्स, बार ढाबे यावर गुटखा कोणाचाही धाक न बाळगता राजरोसपणे विकला जातो त्यात काही कर्मचारी सुध्दा ड्युटी वर असताना गुटखा खाताना आढळून येतात. तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रायव्हेट कार मध्ये २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील बर्हाणपूर येथील गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा नामचिन गुंड गुटखा व्यापारी विक्की डिलाणी याला धुळे तालुका पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लालबाग थाना पोलीस स्टेशन बर्हाणपूर हद्दीमध्ये अटक केली होती त्याच्यावर कारवाई न करता सोडून देण्यात आले होते. त्याच्यावर कारवाई का नाही केली याची चौकशी करून त्या गुटखा किंग ला परत अटक करून ताबा घेतल्यास तो धुळे जिल्ह्यात किती गुटखा व्यापारींना गुटखा तस्करी करतो त्यांचे नाव समोर येतील आपल्या या कारवाई ने अनेक युवकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. महाराष्ट्रात अवैध गुटखाच्या सेवनाने कॅन्सर चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात हौदोस घालत आहे. कमी वयात आई वडिलासमोर मुलांना कॅन्सर मुळे आपला जिव गमवावे लागत आहे. आपणास हात जोडून विनंती करतो की हे गुटखा किंग कोण आहेत हे लवकरात लवकर शोधून यांच्या वर मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्ह्यामधून गुटखा हद्दपार करण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!