मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा

👉🏼 मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा 👈🏼नंदुरबार : — गुरुकुलनगर येथील मतीमंद मुलींची निवासी शाळा ही गेली पंधरा वर्षापासुन शासन निर्णय प्रमाणे सुरु असुन शाळेला चाळीस विद्यार्थी संख्या असुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सांभाळ करतात.वर्षभरात बरेच सामाजिक कार्यकरते हजेरी लावतात.कुणी कपडे,शैक्षणिक साहित्य,अन्नदान,स्वेटर वाटप करत असतात. घरातील आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस हमखास मतीमंद मुलींच्या शाळेवर साजरा करतात.नंदुरबार येथील सामाजिक कार्यकरते श्री. प्रभाकर भगवान चौधरी यांनी त्यांचे चिरंजीव हिमांशु चौधरी याच्या वाढदिवस मतीमंद मुलींसोबत केक कापुन व मतीमंद मुलींना पावभाजी व जीलेबीचे जेवन देऊन साजरा केला. या वेळी हिमांशुचे वडील प्रभाकर चौधरी,आई छायाबाई चौधरी,काका सुरेश चौधरी,कैलास चौधरी,आत्या बेबीताई चौधरी,रत्नाताई चौधरी,मयुर चौधरी,कु.अवनी चौधरी,धिरज महाले,राजलक्ष्मी महाले,संस्थाध्यक्ष भास्कर कुवर,भारती कुवर,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी,गणराज कुवर,वैशाली कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!