*सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील यांचे कार्य वाखाण्या जोगे**रोहाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील श्री समाधान शालिक धनगर हे शेतकरी आपल्या मोटारसायकल वर सोनगीर हुन शेतीसाठी उपयोगी औषधी व दोन गोणी खत घेऊन रोहाणे कडे जातांना अचानक युरिया खताची गोणी ही सोंडले गावाच्या पुढे पडली बराच वेळ पर्यंत कोणी त्यांना मदत करत नव्हते.काही वेळाने शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते श्री उमाकांत शिवाजी पाटील हे त्या ठिकाणी आले व त्यांनी स्वतः खताची गोणी उचलून मोटारसायकल वर ठेवली व त्यांच्या मोटारसायकल ला किक नव्हती म्हणून गाडीला धक्का देखील मारून दिला नंतर शेतकरी समाधान धनगर यांनी शेल्टी येथील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शिवाजी पाटील यांच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं आहे .*
सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील यांचे कार्य वाखाण्या जोगे*
