सारंगखेडा यात्रेत घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून साडेतीनशे वर्षाची पंरपरेची प्रतिमा मलिन

*सारंगखेडा यात्रेत घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून साडेतीनशे वर्षाची पंरपरेची प्रतिमा मलिन* ✍🏽✍🏽 सारंगखेडा यात्रा जगप्रसिद्ध यात्रा असून घोडेबाजार मुळे ( चेतक फेस्टिव्हल ) अधिकच महत्त्व प्राप्त होते परंतु शेकडो वर्षांच्या यात्रेच्या परंपरेत घोडेबाजार पाहण्यासाठी कधीच तिकीट लावले नाही मात्र यावर्षी 30 रू शुल्क आकारून सारंगखेडा यात्रेची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू आहे. सारंगखेडा ग्रामपंचायतीने हात झटकले मग दररोज हजारोंच्या संख्येने घोडे पहायला आलेले यात्रेकरूंचे 30 रू तिकीटाचे पैसे कोणाच्या घश्यात जात आहे ? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहरांपेक्षा खेडेगावातील नागरिकांनाच जास्त उत्सुकता असते सांरगखेडा यात्रेची खेडेगावातील नागरिकांना डिसेंबर महिना आला तर आवर्जून सारंगखेडा यात्रेची वाट पहात असतात.. यावर्षी पाण्याने पाठ फिरवली अवकाळी पावसाने शेतकरी हवाईदिल झाला कापसाला व कांद्याला भाव मिळत नाही .. महागाई ने सर्वसामान्य लोकं बेहाल झाले आहेत..एक दिवसांसाठी का होईना पण शेतकरी वर्ग आपल्या परिवारासोबत सांरगखेडा यात्रेच्या आनंद घेत असतो घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून एकप्रकारे चेष्टाच केली सर्वसामान्य जनतेची ..लोकांच्या सहभाग असलेल्या ठिकाणी शासन महसूल गोळा करते मात्र सारंगखेडा ग्रामपंचायतीने आमच्या कुठलाही संबंध नाही मग महसुलीचा नावाखाली वसुलीचा मेवा कोण खात आहे? घोडे बाजाराशी संबंधित चेतक फेस्टिव्हल समितीने जर निर्णय घेतला असेल तर याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेतली आहे का ? परवानगी घेतली असल्यास त्या आशयाचे फलक मुख्य प्रवेशद्वाराला लावले आहे का ? असे विविध प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा मनात भेडसावत आहे पण यावरून एक गोष्ट मात्र निश्चित सांरगखेड्याची यात्रेची प्रतिमा मात्र मलिन होत आहे. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!