*अयोध्या विमानतळाला आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव दिल्याबद्दल दोंडाईचा येथे मोदी सरकार यांचा जाहीर आभाराचा कार्यक्रम*

*अयोध्या विमानतळाला आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव दिल्याबद्दल दोंडाईचा येथे मोदी सरकार यांचा जाहीर आभाराचा कार्यक्रम* दोंडाईचा: अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळाला रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव देण्यात आले त्याचे औचित्य साधून दोंडाईचा येथे भाजप पदाधिकारी व कोळी समाज बांधवांकडून केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर आभाराचा कार्यक्रम महादेवपुरा कोळीवाडा येथे संपन्न झाला.यावेळी भारतीय जनता पार्टी चे दोंडाईचा शहराध्यक्ष मा. प्रवीण महाजन म्हणाले अयोध्येत राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतिक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळाला रामायण रचनाकार श्री आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिल्याने केंद्रातील मोदी सरकार चे आभार मानले यावेळी भाजप धुळे जिल्हा ग्रामीण चे सरचिटणीस श्री डी एस गिरासे यांनी पंतप्रधान मोदीजी यांचे आभार मानत सर्वासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष मा विजू भाऊ मराठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.. कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘ जय श्रीराम ‘ च्या घोषणा देण्यात आल्या मा.नगरसेवक हितेंद्र भाऊ महाले दोंडाईचा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष छोटु मराठे, सामाजिक कार्यकर्ता मनोज निकम मा.संंजय तावडे मा. नरेंद्र गिरासे, मा. जितेंद्र गिरासे , मा. नरेंद्र कोळी , मा. कृष्ण नगराळे , मा. ईश्वर भाऊ धनगर , सौ.आक्काबाई महाजन ,महेंद्र बाबा , नागेश निकम , विक्की कोळी , रोशन कोळी , जितू कोळी , पप्पू कोळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!