कर्तव्यात कसूर केल्याने सात पोलीस निलंबितधुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा पोलिसांना नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी दिला तोहफा

कर्तव्यात कसूर केल्याने सात पोलीस निलंबितधुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा पोलिसांना नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी दिला तोहफा 31 डिसेंबरच्या रात्रीचा जल्लोष नियंत्रणात आणण्यासाठी नियुक्ती केल्यानंतरही कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या सात पोलीस अंमलदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सेवेतून निलंबित केले असून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या कारवाईमुळे पोलिसांत एकच खळबळ माजली आहे.सविस्तर वृत्त असे की 31 डिसेंबरच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच प्राणांकित अपघात व इतर अपघातांना आळा घालता यावा म्हणून मद्यपी वाहन चालक तसेच मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणारे चालक आदींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीही करण्यात आली होती.या बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीची तपासणी करीत असताना जिल्हा पोलीस घटकातील दंगा काबू पथकाचे (आरसीपी पथक) काही पोलिस अंमलदार अति महत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले.काही अंमलदारांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल केला असता कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता ते गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर भूमिका घेऊन गैरहजर पोलिस अंमलदारांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.कारवाई झालेल्या पोलीस अंमलदारांची नावे अशी आहेत -हवालदार महेंद्र दौलतसिंह ठाकूर (धुळे नियंत्रण कक्ष चालक), पोलीस कॉन्स्टेबल अमोल रमेश भामरे (मोटर परिवहन विभाग, धुळे), शिपाई प्रदीप भटुसिंग ठाकरे, राकेश प्रकाश बोरसे, महिला हवालदार मुक्ता इच्छाराम वळवी, शिपाई विनोद पंडित गांगुर्डे, किशोर श्रीराम पारधी (सर्व साक्री आरसीपी पथक).एसपी श्रीकांत धिवरे यांच्या या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ माजली असून आगामी निवडणुका व इतर बंदोबस्त यामध्ये पोलिसांनी कर्तव्य पालन करावे या हेतूने संकेत दिल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!