कोठली येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार संस्थेचा उपक्रम

कोठली येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार संस्थेचा उपक्रम – – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोठली ता.शहादा येथे समता फाऊंडेशन मुंबई व युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेमार्फत नागरिकांची मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी माजी पोलीस पाटील बाबुसिंग देवबा गिरासे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसाराम माळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश महाजन, शासकीय ठेकेदार अमोल गुलाबराव पाटील, पौलदसिंग गिरासे,सामाजिक कार्यकर्ते प्रवीणसिंग गिरासे यांच्यासह युवकमित्र परिवार संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन,समता फाऊंडेशन चे चुनिलाल पावरा, डॉ .योगेश माळी यांच्यासह रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत समता फाऊंडेशन मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले जात आहेत.त्यात कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय च्या विशेष नेत्रतज्ञा द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी केली जाते व मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. या मोहिमअंतर्गत युवकमित्र परिवार संस्थेमार्फत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्ररोगतज्ञ डॉ. योगेश माळी यांनी 50 पेक्षा अधिक रुग्णाची नेत्रतपासणी केली.याकरिता समता फाऊंडेशनचे शहादा तालुका समन्वयक चुनीलाल पावरा, डॉ.योगेश माळी,एवन ऑप्टिकलचे मालक सादिक मंसुरी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!