छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलांची होणारी वृक्षतोड थांबविण्याबाबत निवेदन देण्यात आले

छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलांची होणारी वृक्षतोड थांबविण्याबाबत निवेदन देण्यात आले उपरोक्त विषयांवे आपणास विनंती करतो की,छत्तीसगड राज्यातील सरगुणा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबर्याच्या पेड्रीमार जंगल अर्थात आदिवासीचे देवस्थान असलेले हसदेव जंगलाचा संपूर्ण परिसर हा भारतीय सविधांनाच्या पाचव्या अनुसूचि मध्ये येत असून ही जंगल जेवविवीधतेने नटलेला नसून ,लाखो आयुर्वेदिक वनस्पती, झाडे- झुडुपे व काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येते असून पक्षांच्या व फुलपाखऱ्यांच्या हजारो जाती वास्तव्यास असून हजारो प्राण्यांच्या जाती जंगलात असून हत्तीचे अनेक कळपसुध्दा आहेत.महोदयांना विनंती करतो की, या परिसरात कोळसा मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे जंगलातील 92 हेक्टर क्षेत्र हे गौतम अडाणी या उद्योगजकाला कोळसा खाणीच्या उत्खननासाठी सदर क्षेत्र बेकायदेशीरित्या दिले असून 450 पेक्षा जास्त जवान हसदेव जंगलात तैनात करून त्यांचा निगराणीत 500 पेक्षा जास्त पेट्रोलवर चालणारे आरे मशीनीच वापर करून जंगलाची प्राणी व हत्तीचे कडपाचे कडप खेडेगावात आश्रयाला आलेले. आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक आदिवासींचा या जंगल तोडीला प्रंचड विरोध असून हसदेव जंगल वाचविण्यासाठी आंदोलने सुध्दा सुरू आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्याना बेकायदेशीरित्या पोलीस बंदोबस्त मध्ये डांबून ठेवण्यात आलेले आहे.महोदयांना विनंती करतो की, भारतीय सविंधानातील पाचव्या अनुसूचिनुसार ना लोकसभा, ना राज्यसभा सर्वोच्च ग्रामसभेला अधिकार बहाल केलेले असतांना गावातील ग्रामसभेचा ठराव न घेता व ट्रायबल एडवायझरी कोन्सिल अभिप्राय न घेता पोलीस बंदोबस्त मध्ये एकतर्फी जंगल तोडीचे काम सुरू आहे, त्यामुळे पर्यावरणाला व जेवविविधतेला धोका निर्माण झालेला असून भविष्यात सुध्दा ऑक्सिजन मिळणार नसून वाळवंटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होणार असून मानवजातीला जगणे कठीण होणार आहे.जंगलात खनिज संपत्ती च्या लालसेपोटी विकासाच्या नावाने होणारे विनाश टाळून मानवतेच्या दृष्टीकोनातुन पर्यावरण व जेवविवीधतेणे नटलेल्या हसदेव जंगलाची सुरू केलेली बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबविण्याचा आदेश पारित करावा .हीच आपणास नम्र विनंती 1)सतीष ठाकरे BTTS प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र2) राहुल उखळदे BTTSता, यूवा अध्यक्ष3) वसंत दादा चौधरी BTTSकार्यकर्ता शहादा4) दिलीप दादा महिरे सामाजिक कार्यकर्ता5) सूनिल दादा भिल BTTSकार्यकर्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!