जनजागृती सेवा संस्थेने अंबरनाथ येथील पत्रकारांचा’सन्मानपत्र’प्रदान करुन केला सत्कार,तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पत्रकारांना ऑनलाईन’सन्मानपत्र’पाठवुन संस्थेने केला पत्रकार दिन साजरा ———————————————————-अंबरनाथ-६जानेवारी१८३२मराठीतील दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी६जानेवारी हा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ येथील अंबरनाथ नगरपरिषदेतील पत्रकार कक्षात सुनिल वाघमारे,प्रफुल्ल थोरात,चंद्रकांत कणसे,शेख तनवीर अहमद,उस्मान शाइ,विनोद देशमुख,शत्रुघ्न उमाप,पुष्पराज गायकवाड,निसार खान,सिझर लाॅरेन्स,परेश भानुशाली,सुनिल अहिरे आदी पत्रकारांना जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात पार पडला.तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकारांना ऑनलाईन पध्दतीने”आकर्षक सन्मानपत्र”पाठवुन जनजागृती सेवा संस्थेने पत्रकार दिन साजरा केला.यावेळी सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले.
जनजागृती सेवा संस्थेने अंबरनाथ येथील पत्रकारांचा’सन्मानपत्र’प्रदान करुन केला सत्कार,तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पत्रकारांना ऑनलाईन’सन्मानपत्र’पाठवुन संस्थेने केला पत्रकार दिन साजरा
