नंदुरबार येथे जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीची बैठक दि. १३-०१-२०२४ रोजी आदिवासीं कोळी समाज समन्वय समितीचे राज्यव्यापी राज्यस्तरीय आंदोलन विषयी प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली.

नंदुरबार येथे जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीची बैठक दि. १३-०१-२०२४ रोजी आदिवासीं कोळी समाज समन्वय समितीचे राज्यव्यापी राज्यस्तरीय आंदोलन विषयी प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. बैठक मध्ये २३ जानेवारी २०२४ पासून आंदोलन सुरू करण्याचा एकमुखी निर्णय झालेला आहे. हे महाआंदोलन जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमात, जमात दाखलें व वैधता प्रमाणपत्र विषयींचे प्रश्न व अडचणीं सोडवणुकी करीता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार आहे.पूर्वतयारी म्हणजे रीतसर शासकीय परवानग्या,बॅनर,जिल्हा नेतृत्व,अनुषंगिक जिल्हा सहकार्य समिती इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.आतापर्यंत शासनाने दिलेली अनेक आश्वासने फक्त कोपराला गुळ लावण्याचा प्रकार ठरलेली आहेत. संविधानिक अधिकार असूनही आदिवासी विकास विभाग आपल्या आदिवासी कोळी जमाती विषयी कायद्याची पायमल्ली करीत राजरोसपणे अन्याय करीत असतांना शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही. शासन वेळकाढूपणा करीत आहे. शेवटचे हिवाळी अधिवेशन संपले, तरीसुद्धा शासनाने कोणताच सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.या बैठकीत जिल्ह्यातील उपस्थितांकडून 23 जानेवारी पासून बेमुदत आंदोलनास सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचे आंदोलन म्हणूनच राबवण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संघटना, संस्था, मंडळे, मंच, प्रतिष्ठाने समाजबांधव, अभ्यासक, विचारवंत, समाजसेवक यांनी सहभाग घ्यावा.या सभेत जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या संमतीने, सहमतीने, चर्चा करण्यात आली. सदर बैठक मतिमंद मुलींची निवासी शाळा,गुरुकुल नगर येथे घेण्यात आली. बैठक ज्येष्ठ नेते भास्कर कुवर् सर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.राजेंद्र सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.. सूत्र संचालन व आभार आदिवासीं कोळी समाज समन्वय समितीचे अध्यक्ष कांतीलाल सोनीस यांनी केले. सर्वानुमते नंदुरबार जिल्हा सहकार्य समिती गठीत करण्यात आली.समितीचे अध्यक्ष सौ.इंदुताई सोनीससदस्य भारती ताई कुवर,ज्योती कोळी,डॉ.राजेंद्र सावळे,भरत पवार,हेमंत सूर्यवंशी,अर्जुन शिरसाठ,घारु कोळी,कमलेश कोळी,सोमनाथ वाघ,काशिनाथ कोळी,हरीराम कोळी,साहेबराव कोळी,नानाभाऊ कोळी,दशरथ जाधव,दगा कोळी,आप्पा कोळी,जितेश महाले,दंगल पवार इ.समाज बांधव उपस्थित होते. आपला विश्वासु भास्कर कुवर सर जेष्ठ सामाजिक कार्यकरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!