आश्रम शाळा विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ

*आश्रम शाळा विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ*नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोटली आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याघटनेने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोठली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीकोठली येथील शासकीय मुलीच्या आश्रमशाळेतील आठवीत शिक्षण घेत होती, अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे,मुलीचे वय तेरा ते चौदा असून या विद्यार्थिनीने ती राहत असलेल्या, आश्रमशाळेतील वरच्या मजल्यावर गळफास घेतला आहे, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ येथील रहिवासी असून, तिने गळफास का घेतला ? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे, विद्यार्थिनीचा मृत्यदेह नातेवाईक आल्यावर त्यांना सोपविण्यात आला असून, पुढील तपासणी अहवालासाठी नंदुरबार जिल्हा रुणालयात पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आला, घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे, उपनिरीक्षक जगन वळवी, नंदूरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, विस्तारअधिकारी निर्मल माळी, जमादार वंतू गावित आदी घटनास्थळी उपस्थित होते, घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच घटनेचा खुलासा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!