कर्जोत ता. शहादा जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंदकर्जोत ता. शहादा–येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१६ जानेवारी २०२४ रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.आनंद मेळाव्यात जि. प. शाळा केंद्र प्रमुख माननीय श्री. शंकर अहिरे सर, कर्जोत ग्रा. पं. सरपंच माननीय श्री. सुभाष सोनवणे, कर्जोत ग्रा. पं. बांधकाम समिती अध्यक्ष माननीय श्री. संतोष गिरासे, कर्जोत ग्रा. पं. बांधकाम समिती सचिव माननीय श्री. तेजराज निकुंभे उपस्थित होते.सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिक्षिका प्रतिभा जाधव यांनी केले.विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका प्रतिभा जाधव यांनी फार परिश्रम घेतले
Related Posts
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस…
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस….. तालुका चाळीसगाव पिलखोड या खेडेगावातून नेहा शामराव मोरे(कोळी)जिद्द आणि…
ललित वारुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची जनभावना
*ललित वारुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची जनभावना*( प्रतिनिधी गोपाल कोळी )दोंडाईचा ता. बेटावद जिल्हा…
माळीवाडा परिसरातील लोकांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव
“माळीवाडा परिसरातील लोकांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव !!…