*पुर्ण धुळे जिल्ह्य़ात नवीन पोलीस अधीक्षक यांच्याकडून बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाईची मोहीम गेल्या पंधरवाड्यापासून सूरू असून दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई शुन्य.*

*पुर्ण धुळे जिल्ह्य़ात नवीन पोलीस अधीक्षक यांच्याकडून बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाईची मोहीम गेल्या पंधरवाड्यापासून सूरू असून दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई शुन्य.*

प्रतिनिधि = आण्णा कोळी दोंडाईचा

दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोगस डॉक्टरांच्या याद्या पोलीस निरीक्षकांना उपलब्ध केल्यावरही कोणतीच कारवाई नाही सेटलमेंट झाले की काय? डॉक्टरी व्यवसायाला काळीमा फासणारे काही फर्जी डॉक्टर दोंडाईचा व तालुक्यात सक्रिय आहेत …माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागवली असता त्यात दोंडाईचा, मालपुर, निमगुळ, मेथी , विखरण, हतनूर, रेवाडी, विखरण , वरझडी, भडणे, चौगाव बु. सुराय येथील भामटे डॉक्टरांचा समावेश आहे…ही यादी दोंडाईचा पोलिस स्टेशनला पाठवली आहे तरी देखील त्यावर कार्यवाही होत नाही आहे… म्हणजे दोंडाईचा पोलिस स्टेशनचे काही साटेलोटे आहे का ? अशीच शंका उपस्थित होत आहे… डॉक्टरी व्यवसायाला सर्व सामान्य माणूस देवत्वचा नजरेने पाहतो… कष्टकरी शेतकरी वर्ग असो व्हा मोलमजुरी करणारा मजूर आपल्या परिवारावर जर वैधाकिय संकट ओढावले तर तो प्रसंगी व्याजाचे पैसे घेतो व आपल्या परिवारास संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो .. त्याचात जर हे भामटे डॉक्टर जर गोरगरिबांची आर्थिक लूट करत असतील तर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी…पण संविधानाच्या महत्वाचे पदांवर बसलेली निष्कृष्ट दर्जाचे अधिकारी जर लाच घेऊन जर यांना वाचवत असतील तर हे दुर्दैव म्हणावे लागेल… उद्या परत दोंडाईचा पोलिस स्टेशनला ही बोगस डॉक्टरांची यादी मी स्वतः देईन जर यावर आठ दिवसांत कार्यवाही नाही झाली तर या भामटे डॉक्टरांची यादी सर्वश्रुत करण्यात येईल व मा. धुळे जिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांच्या निर्देशनात आणुन देण्यात येईल. *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!