आदिवासी कोळी जमातीचे 23 पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण व धरणे आंदोलन

आदिवासी कोळी जमातीचे 23 पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण व धरणे आंदोलन… अनुसूचित जमातीतील टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार यांना 1976 च्या सुधारित कायद्यानुसार हक्क व अधिकार मिळत नसल्याचा निषेधार्थ येत्या मंगळवारी दिनांक 23 जानेवारी पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (जळगाव) यांनी दिलेला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.प्रशासन हे शासनाचा दबावामुळे घटनादत्त अधिकार असून आदिवासी कोळी जमातिबाबत कोणताही ठाम निर्णय घेत नाही. असे मत प्रभारी अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी सांगितले आहे. राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक ऍड. शरदचंद्र जाधव यांनी म्हटले आहे की कोळी किंवा हिंदू कोळी अशा नोंदी असल्या तरी अर्जदार टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार,डोंगर कोळी यापैकीच आहे असतात.या मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिनांक 18 जानेवारी रोजी देण्यात आले. निवेदन देतांना नंदुरबार समन्वय समितीचे अध्यक्ष सौ.इंदू ताई सोनीस , भास्कर कुवर,डॉ.राजेंद्र सावळे,कांतीलाल सोनीस,सौ.भारती ताई कुवर,भटू ठाकरे,नारायण जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!