हळदी कुंकू चा कार्यक्रम आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षिका विद्या पाटील मॅडम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ भाग्यश्री राकेश गुजर व माध्यमिक विद्यालयाच्या सौ .कल्पना पाटील हे लाभले . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला . सर्व महिला पालकांनी या सहभाग नोंदवून एकमेकास हळदी कुंकू लावून व तिळगुळ देऊन हा कार्यक्रम साजरा केला . या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या . शाळेच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मातापालकांना एक भेटवस्तू देण्यात आले . कार्यक्रमादरम्यान दैनंदिन धकाधकीच्या जीवनात व्यस्त असलेल्या व संसारिक गाडा ओढणाऱ्या मातपालकांना विरंगुळा म्हणून विविध खेळ घेण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो मनीषा माडी यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी प्रगती जगदाळे यांनी मांडले . शाळेचे प्रिन्सिपल श्री एम के गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सौ रेणुका पाटील , सौ माधुरी पाटील , सौ ज्योती पाटील , कु .यामिनी जगदाळे ,कु . भारती पाटील ,कु . कल्पना गुलाले ,कु .महिमा पाटील यांनी मेहनत घेतली .
Related Posts
नेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना “सुषमा स्वराज अवार्ड”देऊन ८ मार्च ला सन्मान करण्यात येणार
नेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना “सुषमा स्वराज अवार्ड”देऊन ८ मार्च ला सन्मान करण्यात येणार*नेर: धुळे तालुक्यातील नेर येथे…
आदिवासी कोळी जमातीची बदनामी करणाऱ्या लकी जाधवचा निषेध..
आदिवासी कोळी जमातीची बदनामी करणाऱ्या लकी जाधवचा निषेध..चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील इतर आदिवासी संघटनांना सोबत घेऊन कोळी जमातीच्या विरोधात चोपडा तहसिलदार…
जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत.
जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत. जिल्हा परिषद शाळा कर्जोत तिथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत दोन वर्गखोल्या आहेत…