श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महादेवपुरा संतोषी माता मंदिर परिसरात मा. जयकुमार भाऊ रावल यांच्या संकल्पनेतून भंडारा व सार्वजनिक दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न

*श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महादेवपुरा संतोषी माता मंदिर परिसरात मा. जयकुमार भाऊ रावल यांच्या संकल्पनेतून भंडारा व सार्वजनिक दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न* ✍🏽✍🏽 ‌दि. 21 अयोध्येत साकारलेल्या भव्य मंदिरात उद्या 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार असून या पार्श्वभूमीवर दोंडाईचा महादेवपुरा संतोषी माता मंदिर परिसरात दिपमहोत्सव व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही म्हणून पूर्ण भारतात आपल्या भुमीतचं दिव्य भव्य सोहळा साजरे होत आहेत. प्रभू श्रीरामाच्या वनवास हा पाचशे वर्षांनी संपणार आहे या पार्श्वभूमीवर पूर्ण भारतात दिवाळी साजरी होत आहे. भंडारा व दिपमहोत्सवाला मा. नामदार जयकुमार रावल यांनी उपस्थित राहुन प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नागरिकांना पटवून दिले. श्रीराम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक यांचे महत्वपूर्ण योगदान होते.1992 मधे अयोध्येत देशाच्या कानाकोपऱ्यातुन कारसेवक सहभागी झाले होते. त्यात दोंडाईचा येथील मा.नगरसेवक छोटु भाऊ मराठे ( तात्काळीन बजरंग दल अध्यक्ष दोंडाईचा ) हे देखील उपस्थित होते म्हणून त्यांचा सत्कार मा. जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आला.भंडाराचे पूर्ण व्यवस्था परिसरातील नागरिक यांनी केले यावेळी दोंडाईचेतील मा. रवी भाऊ उपाध्ये , मा. हितेंद्र भाऊ महाले , परिसरातील माजी नगरसेवक मा. नरेंद्र कोळी , मा. नरेंद्र गिरासे मा. जितेंद्र गिरासे मा.निखील जाधव , मा.कृष्णा नगराळे , मा.विजुभाऊ मराठे , सामाजिक कार्यकर्ता पंकज भाऊ चोळके व परिसरातील तरूण वर्ग माता बघिणी व ज्येष्ठ नागरिक हे उपस्थित होते . *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!