विकास इंग्लिश मिडीयम स्कूल वडाळी ता.शहादा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न शैक्षणिक उपक्रमासोबत मनोरंजनाची जोड असली तर विद्यार्थी घडविण्यास मदत होतेसाहेबरावगिरी गोसावी (संचालक – श.ता.को ऑप एज्यूकेशन सोसायटी शहादा)आज विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आनंद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री.साहेबरावगिरी गोसावी, वडाळीचे उपसरपंच श्री.अभयगिरी गोसावी माजी सरपंच श्री.दीपकभाई पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.प्रतापभाई चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाबाई मोहिते,जिल्हा परिषद शेतकी शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनील माळी, मुख्याध्यापक श्री.एस. डी.भोई सर पर्यवेक्षक श्री.व्ही.आर.पाटील, सर उपस्थित होते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात जवळपास 60 विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले जी.एस.विद्यामंदिर मधील विद्यार्थी व गावातील अनेक पालकांनी स्वेच्छेने कार्यक्रमांमध्ये भेट दिली आनंद मेळाव्यामध्ये जवळपास 22 हजार रुपयाची उलाढाल हे विद्यार्थ्यांमार्फत स्टॉलद्वारे करण्यात आली विकास इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रशासक श्री.चंद्रकांत रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश मिडियम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत रायसिंग सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाखा शिंपी यांनी केले.
Related Posts
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून भाव…
सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणेची पदावरून हकालपट्टी!**बिरसा फायटर्स आक्रमक;पदावरून बडतर्फ करण्याची मागणी**पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन*
*सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणेची पदावरून हकालपट्टी!**बिरसा फायटर्स आक्रमक;पदावरून बडतर्फ करण्याची मागणी**पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन* शिरपूर:बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष…
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पत्रकारांनी केलेले कार्य अनमोल आहे असे प्रतिपादन तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पत्रकारांनी केलेले कार्य अनमोल आहे असे प्रतिपादन तहसीलदार…