झुंजार क्रांती….प्रतिनिधी ….चिमठाने परिसर… प्रविण भोई….
चिमठाणे गावाच्या पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट अभावी दुसरा टप्पा रखडला…..
चिमठाणे येथे पंतप्रधान आवास योजनेच्या शासनमार्फत उद्दिष्ट कोटा आला नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील घरकुल लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाची महत्त्वकांक्षी योजनेत पंतप्रधान आवास योजनेच्या मोठा वाटा आहे. मात्र चिमठाणे दलवाडे पिंप्री ग्रामपंचायतिला कोटा उपलब्ध नसल्याने ड यादीतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र दिसत आहेत.. चिमठाणे- दलवाडे, पिंप्री या गृपग्रमपंचायतला सन -2021-22 या वर्षी सुमारे 102 घरकुलांचे उद्दिष्टे आली होती.त्यात पंतप्रधान योजनेचे 102 लाभार्थी रमाई आवास योजनेचे 07 शबरी आवास योजनेचे 03 लाभार्थी होते. त्यात त्यात इतर लाभार्थ्यांचे काम पूर्ण झाले असून .16 लाभार्थ्यांची काम अपूर्ण असल्याचे ग्रामसेवक एस.पी पाटील यांनी सांगितले.मात्र या नंतर शासनामार्फत कोटा उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.शासनाने लवकरात लवकर चिमठाणे गावासाठी पुढील कोटा उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी प्रतिक्षित लाभार्थी करीत आहेत...
*पंतप्रधान आवास योजनेचे पुढील उदिष्टाची मागणी आल्यास दुसऱ्या
टप्प्यातील लाभार्थ्यांची उद्दिष्टे आम्ही लवकरात
लवकर पूर्ण करू व पुढील टप्प्यातील लाभार्थ्यांना
लाभ देऊ…..
ग्रामसेवक – एस.पी.पाटील
माझे नाव पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत आले असून
मात्र कोटा उपलब्ध नसल्याने मी ग्रा.पंचायतीच्या वारंवार फेऱ्या मारत आहे. मी एक पाय व हाताने व्याधीग्रस्त असून मला त्वरित लाभ द्यावा अशी मागणी केली आहे..
प्रतिक्षित लाभार्थी – किशोर दोधा मिस्तरी