पाडळदा:महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियन शहादा तालुक्याच्या वतीने शहादा येथील उप विभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर राष्ट्रीय वृद्धापकाळ व श्रावणबाळ निवृत्ती वेतनाकरिता वयाची अट साठ वर्ष करावी, तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व योजनांच्या लाभार्थींना दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात यावे, गायरान, पडीक जमीन, वनपट्टे , कसणाऱ्यांच्या नावे करा व सातबारा द्यावा. आदि. प्रलंबित मागण्यांकरिता हाथात लाल झेंडे घेत, बढती महंगाई रोक दो। आमच्या लढा पोटासाठी नाही धर्मासाठी. आदि. घोषणा देत जिल्ह्यातील शेतमजुरांचे स्थलांतर थांबवा. शहादा वैजाली नांदर्डे करणखेडा रस्त्यावरील वैजाली ते नांदर्डे दरम्यानच्या वाकी नदीवरील पुलाचे बांधकाम करा. रेशन व आरोग्य व्यवस्था बळकट करा. पंतप्रधान किसान सन्मान निधी सारखी शेतमजुरांनाही सन्मान निधी द्यावी. सारंखेडा प्रकाशा बॅरेजचे पाणी शेतकऱ्यांचा बांधापर्यंत न्यावे. इत्यादी मागण्यांचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा(भा.प्र.से.) यांना देण्यात आले. निदर्शने आंदोलनात लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य उपाध्यक्ष ईश्वर पाटील राज्य सदस्य बुधा पवार जिल्हा नेते सिताराम माळी, दिलीप ईशी, राजू गिरासे, सुशिलाबाई पवार वैजयंताबाई मराठे, प्रदीप बोरसे, संजय ठाकरे, सुमनबाई कोळी, अक्काबाई भिल, बिजनबाई भिल, सुशिलाबाई मोरे, सह महिला शेतमजुरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत सह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
राष्ट्रीय वृद्धापकाळ व श्रावणबाळ निवृत्ती वेतनाकरिता वयाची अट साठ वर्ष करावी
