*दोंडाईच्याचेत नव्याने रूजू झालेले प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.सुरेश शिरसाठांना अवैध धंदे रोखण्याचे आव्हान*
*आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
✍🏽✍🏽 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मा. पोलिस अधीक्षक धिवरे साहेबांनी जिल्हा अंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या त्यात मा. श्रीराम पवार यांची बदली शिरपूर ( सांगवी ) येथे करण्यात आली व त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सुरेश शिरसाठ यांची प्रभारी दोंडाईचा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.मागील पाच ते सहा महिन्यांपासून घरफोड्या , मोटरसायकल चोरीच्या घटनेत प्रंचड वाढ झाली आहे दिवसाढवळ्या मानवीवस्तीत जुगार माफिया सक्रिय झाले आहेत याला लगाम लावण्यात मा. श्रीराम पवार हे पूर्णपणे अपयशी राहिले आता नवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.सुरेश शिरसाठ यांना शहरांसह तालुक्यातील अवैध धंदे रोखण्या बरोबरच पोलिस कर्मचाऱ्यांत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र ते यात कितपत यशस्वी होतात हे बघणे सध्यातरी औत्सुक्याचे ठरणार असले तरी दोंडाईचा पोलिस निरीक्षकांची खुर्ची संगीत खुर्ची बनू नये अशीच अपेक्षा सर्वजणच व्यक्त करत आहेत. दोंडाईचा पोलिस निरीक्षक पदावरून बदली झालेले मा. श्रीराम पवार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व गुन्हेगारांच्या सुळसुळाट झाल्याचे दिसून आले . धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून दोंडाईचेत जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या खऱ्या मात्र यात दोंडाईचा पोलिस अंधारतच राहिले असल्याचे दिसून आले शेवटी पैशांच्या तोड्यापाण्या करून प्रकरण पद्धतशीर पणे दाबण्यात आले मागील दोंडाईचा पोलिस निरीक्षक यांच्यावर एक मोठ्या राजकीय शक्तीचा हात होता म्हणून अवैध व्यवसाय सुळसुळाट सुरू होते अशीच चर्चा दोंडाईचेतील नागरिक करीत आहेत. त्यामुळे आता नवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सुरेश शिरसाठ कशा प्रकारे दोंडाईचेला पुढे घेऊन जात असतांना अवैध धंद्यांना व घरफोड्या , मोटरसायकल चोर यांच्या कशाप्रकारे बिमोड करतात हे बघावे लागणार आहे.