व्हाईस ऑफ मीडिया च्या डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची निवड करण्यात आल्याने राष्ट्रीय स्वंस्थापक अध्यक्ष संदिपजी काळे यांच्या हस्ते विजय पाटील यांनां शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

शहादा : व्हाईस ऑफ मीडिया च्या डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची निवड करण्यात आल्याने राष्ट्रीय स्वंस्थापक अध्यक्ष संदिपजी काळे यांच्या हस्ते विजय पाटील यांनां शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राज्य कार्याध्यक्ष नानासाहेब योगेंद्रजी दोरकर, जिल्हाअध्यक्ष रमाकांजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सन्मित्र विजय पाटील यांची डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .पंचसुत्री कार्यक्रमातून पत्रकारांसाठी देशभर व्हॉईसऑफ मीडिया संघटनेचे काम- राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनीनंदुरबार येथे पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद असताना आपले मत मांडलेयापुढे काळे साहेब म्हणाले की , सर्व भिस्त असलेली पत्रकारिता आज कुठेतरी डगमगळते आहे. पत्रकारितेत काम करणारा माणूस हा कुठेतरी अनेक अडचणींमुळे हैराण आहेत. यामुळे पत्रकारांना काय काम व कुठे करावे हे देखील आजच्या काळात त्या अडचणीमुळे समजत नाही. म्हणून पत्रकाराला एका चौकटीत बसून पत्रकारितेसंदर्भात भूमिका करता यावी, या दृष्टीने व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना काम करीत आहे. पंचसुत्री कार्यक्रमातून अवघ्या तीन वर्षात देशभर संघटनेचे काम विणले गेले.असून त्याच दृष्टीने काम व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी काम करीत आहे. म्हणून सर्वांनी यात सहभागी होऊन सकारात्मक दृष्टीने काम करावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.नंदुरबार येथे व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भेट देऊन जिल्हा व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत संवाद साधला. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, कार्याध्यक्ष डॉ.आय.जी.पठाण, उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, सरचिटणीस राकेश कलाल, धनराज माळी, खजिनदार विनय जैन, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार, नंदुरबार तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर, विष्णू जोंधळे, शहादा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, बापू घोडराज, हर्षल सोनवणे, विजय पाटील, दिलीप बडगुजर, प्रविण चव्हाण, जगदिश ठाकुर, अकील पिंजारी, हिरालाल मराठे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केले. सुत्रसंचालन धनराज माळी यांनी केले. आभार सूत्रसंचालन राकेश कलाल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!