*औरंगपूर येथे देशभक्ती सांस्कृतिक कार्यक्रमाचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न* 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा औरंगपूर केंद्र-पाडळदा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांचे शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला.आदिवासी पाड्यातील दऱ्या-खोऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय भावना जागृत व्हावी.आणि उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याची फार मोठी संधी उपलब्ध केली जाते. विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव देऊन समाजाभिमुख दृष्टिकोन वृद्धिंगत होत असतो.म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री.एकनाथ वळवी दादा, होते प्रमुख पाहुणे उपसरपंच आनंद सिंग दादा शेवाळे ‘ग्रामसेवक आप्पा, सौ.राजेश्वरीताई महीरे ,सुरेश आप्पा पाटील, भिका आप्पा पाटील, सखाराम गुरुजी ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदसिंग पवार , शामभाऊ पाटील ,माजी सरपंच श्रीमती अंजू ताई शेवाळे ,श्रीमती कल्पनाताई इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात ‘ शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ‘ चे अध्यक्ष सौ.राजेश्वरी महीरे , उपाध्यक्ष सौ.मीनाक्षी पाटील,सचिव श्री.पंकज अहिरे सर व संस्थेचे पदाधिकारी यांनी शाळेमध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विजेत्या गाण्यांना ट्रॉफी बक्षीस म्हणून दिल्या .शाळेमध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने कौतुक केलं, त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्रराज देवढे यांनी संस्थेचे तसेच उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा घडवून आणू असा विश्वास देत शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमास मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्रराज देवढे सर,भोसले सर व माकत्या वळवी सर यांनी परिश्रम घेतले.शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ‘ चे अध्यक्ष सौ.राजेश्वरी महीरे , उपाध्यक्ष सौ.मीनाक्षी पाटील,सचिव श्री.पंकज अहिरे सर व संस्थेचे पदाधिकारी यांनी सदिच्छा देत कार्यक्रमाचा गोड शेवट केला…
Related Posts
समस्त_आदिवासी_समाजा_अंतर्गत निवेदन देण्यात आले नंदुरबार येथे*
*समस्त_आदिवासी_समाजा_अंतर्गत निवेदन देण्यात आले नंदुरबार येथे* *नंदुरबार ,नवापूर ,अक्कलकुवा, धडगाव ,तळोदा ,शहादा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा* दि.20 डिसेंबर 2023 रोजी, RSS…
शिक्षण हक्क परिषदांचे ठराव जिल्हाधिका-यांना देण्यात आले,शाळा वाचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानने घेतला पुढाकार…!
*शिक्षण हक्क परिषदांचे ठराव जिल्हाधिका-यांना देण्यात आले,शाळा वाचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानने घेतला पुढाकार…!* ठाणे (प्रतिनिधी-प्रियंका गावंडे)शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शाळा…
आर.सी.पटेल तालीमेचे पहेलवान श्रुती महेंद्र कोळी ४१ किलोवजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी
आज दि.१/१/२०२४ रोजी धुळे जिल्हा जिल्हास्तरीय ग्रॅपलींग (कुश्ती) स्पर्धेत आर.सी.पटेल तालीमेचे पहेलवान श्रुती महेंद्र कोळी ४१ किलोवजन गटात प्रथम क्रमांकाने…