*रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-बदलापूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. .. !* बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) नोकरी व्यवसाय कामधंदा निमित्त बदलापूर परिसरात स्थायिक झालेल्या कोकण वासियांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचा वर्धापन दिन ,काल दिनांक 28 जानेवारी रोजी बदलापूर पश्चिम येथील अजय राजा सभागृहात तुडुंब गर्दीत आणि मोठ्या उत्साहात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, दशावतारी नाटक, हळदी कुंकू समारंभ, पैठणीसाठी लकी ड्रॉ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मंडळाचे सचिव मंगेश कदम यांनी मंडळाला द्वारे सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय क्षेत्रात चालविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विजय सावंत यांनी या सामाजिक मंडळांचे महत्त्व स्पष्ट करतानाच अधिकाधिक तरुणांनी अशा प्रकारच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजाची सेवा करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच पालकांनी आपल्या मुलांना अशा सामाजिक संघटनांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे अशी आग्रही भूमिका मांडली. स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कोकणातील कला म्हणजेच दशावतारी नाटक. नाटकाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . केरळ, तामिळनाडू, ओरिसातील नृत्यप्रकार जर जगप्रसिद्ध होतात तर मग आपल्या या पारंपारिक कलेचे जतन आणि संवर्धन सुद्धा आपल्यालाच करावे लागेल असे आवाहन कार्यक्रमाचे सूत्र- संचालक महेश सावंत यांनी उपस्थितांना केले. कालच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या खासदार श्री अरविंद सावंत यांनी मंडळाच्या कार्याचे भरभरून कौतुक केले . हे मंडळ माझ्या बांधवांचे आहे आणि मी तुमचाच आहे हे सांगतानाच आपण कोकणी माणसे फणसाच्या गऱ्यांसारखे गोड आहोत पण तरीही आपण सावध राहायला पाहिजे संघटित राहायला हवे असे आवाहन त्याने उपस्थित त्यांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाला बदलापूरचे माजी नगरसेवक श्री. संभाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेदवनकर व मंडळाचे पदाधिकारी आणि मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Related Posts
दोंडाईचेत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनेत वाढ दोंडाईचा पोलिसांचे दुर्लक्ष
*दोंडाईचेत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनेत वाढ दोंडाईचा पोलिसांचे दुर्लक्ष* दोंडाईचा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत…
हस्ती पब्लिक स्कूलतर्फे महादेव वस्ती नेर शाळेस सचित्र बालमित्र पुस्तक भेट
*नेर:* *हस्ती पब्लिक स्कूलतर्फे महादेव वस्ती नेर शाळेस सचित्र बालमित्र पुस्तक भेट:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील महादेव वस्ती जि.प.शाळेस…
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन नराधमाला…