ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ७वे वर्ष पदार्पण दिन भव्य रक्तदान आणि रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय पहिली ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न ————————————————————डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र मालवण,सिंधुदुर्ग,गोवा,मुंबई मध्ये रक्तदान क्षेत्रात गेली सहा वर्षे कार्यरत आहे.७वे वर्ष पदार्पण निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या वर्षी रक्तदान जनजागृती या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.काव्य काव्य स्पर्धेला राज्यभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रथम क्रमांक-सुरेश कांदळगावकर-डोंबिवली, द्वितीय क्रमांक-संध्या केळकर-भांडुप,तृतीय क्रमांक-सौ.विद्या पवार,चतुर्थ-अभिजित थोरात-पनवेल,पाचवा-निलेश कोकमकर-रत्नागिरी,अमोल बोडके-नायगाव.उत्तेजनार्थ-साईर्थ ढोलम,जयराम नाईक,सुधाकर कांबळी,अनन्या बागवे,ऐश्वर्या गावडे,श्रीधर देवलकर,सुरेश पाटील,निधी सावंत,राजेंद्र सावंत,गौरव कावले या स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानपदक देण्यात आले.या स्पर्धे साठी कवियत्री सौ.मेघना जोशी-मालवण सिंधुदुर्ग,कवियत्री अनिता कळसकर-कल्याण,कवीवर्य-चंद्रकांत परब-भांडुप यांनी परिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.रक्तदान शिबिर आणि काव्यवाचन स्पर्धा पारितोषिक वितरण सोबत आदर्श रक्तदाता सन्मान तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तीमत्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.चिदानंद रक्तपेढी,शास्री नगर शासकीय हाॅस्पिटल डोंबिवली वेस्ट हा रक्तदान शिबिर व पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.रक्तपेढीचे बिजाॅय सर यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच थिंक फाऊंडेशन संस्थापक-विनय शेट्टी(थॅलेसेमिया निर्मूलन मार्गदर्शक भारत)यांची प्रमुख उपस्थिती होती.शतकवीर रक्तदाते प्रशांत म्हात्रे(जीवनदाता स्वयंसेवी संस्था मुंबई)जय साटेलकर,अमोल सावंत(युनिक ब्लड मोटिव्हेटर)इंद्रवर्धन पटेल(वरुण फाऊंडेशन डोंबिवली)गुरुनाथ तिरपणकर,श्रुती उरणकर(जनजागृती सेवा संस्था)बाळकृष्ण पांचाळ(विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली)राजेश पारधी(ग्लोबल रक्तदाते मालवण)सुर्यकांत पारधे(भारती फाऊंडेशन डोंबिवली)सचिन आचरेकर(ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था)सचिन जोईल,विनायक पावसकर, वैभव सावंत,प्रदिप चव्हाण(सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ)सौ.स्वाती चौकेकर,गावकर,मिथेश गावकर,सुधीर कांदळगावकर(मालवणचो कट्टो प्रतिष्ठान)तसेच काव्य वाचन पुरस्कार सोहळ्याचे समालोचक वैभव गावडे या सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास चार्टर प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंडचे डाॅ.राजेश विनायक कदम,मालवणचे उद्योजक राजा शंकरदास, साईकृपा कंन्स्ट्रक्शन कणकवलीचे राजु मानकर,उच्च न्यायालयाचे वकील एॅड.प्रदीप बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर व काव्यवाचन पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व रक्तदाते सहभागी संस्था,सर्व कार्यकारी व सर्व ग्लोबल रक्तदाते आयोजक मंडळी सिध्देश मांडवकर,सागर चव्हाण,स्वप्नील चव्हाण,किरण पुजारी,सौ.श्रुती उरणकर,सौ.स्वप्नाली पांचाळ,विनायक पाटील,किशोर महादेव,प्रसाद तारी,मितेश सुद्रिक,गुरुदास घाडी,वसंत परब,आत्माराम पवार,प्रसाद शिरसाठ,चेतन रासम,विजय पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ७वे वर्ष पदार्पण दिन भव्य रक्तदान आणि रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय पहिली ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न
