सुशिलकुमार पावरा भाजपचे हिना गावीत व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांना देतील टक्कर!**बिरसा फायटर्सची काय आहे राजकीय ताकद?

*सुशिलकुमार पावरा भाजपचे हिना गावीत व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांना देतील टक्कर!**बिरसा फायटर्सची काय आहे राजकीय ताकद?*👉 *३५५ हून अधिक शाखा* 👉 *२ लाख सभासद संख्या* 👉 *२६ लोकनियुक्त सरपंच* 👉 *२६ ग्रामपंचायतीवर सत्ता*👉विद्यार्थी, युवक,महिला यांच्या स्वतंत्र शाखा( *राज्यशाखा,विभागीय शाखा,जिल्हा शाखा,तालुका शाखा,गांव शाखा*) 👉 *अष्टपैलू व लढाऊ,दमदार उमेदवार* शहादा:आगामी लोकसभा निवडणूकीत नंदूरबार लोकसभेचे भाजपकडून उमेदवार हिना गावित व काँग्रेस कडून के.सी.पाडवी यांना उमेदवार मिळू शकते.अशी राजकीय चर्चा सुरू आहेत.भाजप कार्यकर्त्यांकडून आदिवासी व्यक्तींवर अत्याचार व भाजप सरकार कडून आदिवासी विरोधीधोरण यामुळे आदिवासी बहूल असलेल्या नंदूरबार जिल्ह्य़ात भाजपविरोधी वातावरण आहे,त्यामुळे आदिवासींची मते भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत. के.सी.पाडवी यांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे प्रचंड नाराज असलेला मतदार वर्ग जिल्ह्य़ात निर्माण झाला आहे.काँग्रेस पक्षाला मानणारे व के.सी.पाडवीला विरोध करणारे युवक वर्ग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे काँग्रेसने के.सी.पाडवीला उमेदवारी दिली तर आम्ही मतदान करणार ,असे खुले आम म्हणणारा युवा मतदार वर्ग दिसत आहे. अशा वातावरणात बिरसा फायटर्सचा उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना मानणारा मोठा शिक्षित मतदार वर्ग समोर येत आहे.international idol, राष्ट्रीय कलामित्र, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, शिक्षक, कवी,लेखक,समाजसेवक, गायक, नृत्यक, टिक टाॅक स्टार, कराटेपटू आणि ५०० वेळा उपोषण करणारे आदिवासींचे अण्णा हजारे अशी चांगली ओळख सुशिलकुमार पावरा यांची जनमानसात आहे. बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात ३५५ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. २६ लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.संघटनेत शिक्षक,डाॅक्टर, वकील,आर्मी,पहिलवान, गायक, नृत्यक, संगितकार, लेखक, कवी,पत्रकार,शेतकरी,मजूर, विद्यार्थी,महिला तसेच आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे. बिरसा फायटर्स संघटनेची स्वतंत्र अशी आदिवासी विचारधारा आहे.आदिवासींच्या एकूणच विषयावर संघटना काम करते आहे.चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या अवैध जात प्रमाणपत्रावरून त्यांना पदावरून हटवा,यासाठी बिरसा फायटर्सने याचिका दाखल केलेली आहे,बोगस आदिवासी,इतर जातींचा आदिवासींमध्ये आरक्षणाचा समावेश,पेसा भरती व शासनाच्या चूकीच्या धोरणांविरोधात काम करताना बिरसा फायटर्सचे संघटना नेहमीच आघाडीवर असते.समाजसेवा हीच आमच्या संघटनेची ओळख आहे.आमची संघटना पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत २६ सरपंच निवडून आणत असेल तर लोकसभेत खासदार व विधानसभेत आमदार निवडून आणण्याची क्षमता आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांत आहे.आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू.असा विश्वास बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!