ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र पहिली राज्यस्तरीय रक्तदान जनजागृती काव्यवाचन स्पर्धेत सुरेश कांदळगावकर यांच्या कवितेला प्रथम क्रमांक ———————————————————–डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र रक्तदान क्षेत्रात ७व्या वर्षात पदार्पण करत असताना रक्तदान शिबिराबरोबर पहिली राज्यस्तरीय रक्तदान जनजागृती ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती.महाराष्ट्रातुन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत श्री.सुरेश कांदळगावकर(श्री रामवाडी,वेंगुर्ले)यांच्या”एकदा तरी रकात दान कर” या मालवणी कवितेला प्रथम मिळाला.चिदानंद रक्तपेढी, शास्री नगर शासकीय हाॅस्पिटल डोंबिवली वेस्ट येथे आयोजित पारितोषक वितरण समारंभात सुरेश कांदळगावकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,मेडल अशा स्वरुपात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक समारंभपुर्वक प्रदान करण्यात आले.सुरेश कांदळगावकर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
Related Posts
कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ 2023-24 वर्षाची कार्यकारिणी जाहीर
कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ 2023-24 वर्षाची कार्यकारिणी जाहीर…दिनांक 31-07-2023 रोजी कलाल समाज नवयुवक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद कानडे…
म्हसदी येथे कुस्त्यांची दंगल; कुस्ती मल्लाना भोजनाची व्यवस्था
म्हसदी येथे कुस्त्यांची दंगल; कुस्ती मल्लाना भोजनाची व्यवस्था: नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील अमरावती पात्रात सकाळी नऊ वाजता कुस्तीची दंगल…
मणिपूर का जळते आहे?
मणिपूर का जळते आहे? मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले…