शिरपूर उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद होऊन चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याबाबत मानव विकास पत्रकार संघा कडून निवेदन दिले*

*शिरपूर उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद होऊन चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याबाबत मानव विकास पत्रकार संघा कडून निवेदन दिले**शिरपूर उपविभाग अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन शिरपूर ,थाळनेर ,सांगवी शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सर्रास सुरू आहे शिरपूर उपविभागात अवैध मध्य विक्री जुगार सट्टा मटका गुटका व इतर अंमली पदार्थाचे अवैध व्यवसाय जोमात विनापरवाना बनावट मध्यविक्री देखील सुरू असून उपविभागात सट्टा मटका व जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत परिणामी दारू गुटका मटका जुगारामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होऊन अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर येऊन अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत तरी उपविभागातील पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे अवैध व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून त्यांच्यावर कायद्याच्या वचक बसविणे गरजेचे असून उपविभाग पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायामुळे होणाऱ्या गुंडगिरीला आळा घालने आवश्यक आहे उपविभाग पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी वरील सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठीचे निवेदन मानव विकास पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात आले यावेळी मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रदीप पवार, कृष्णा कोळी, वसीम खाटीक, हिरालाल चौधरी ,रवी भावसार, जयंत सरदार ,कैलास राजपूत, पंडित कोळी, दिनेश पाटील, दिनकर पवार ,दिलीप पाटील ,बिस्मिल्ला शहा रमजान शहा, रवी पेंढारकर, सोनू मराठे ,अनिल चौधरी ,संजय बाशींगे ,अश्फाक मिर्झा ,वसीम शेख ,अनिल त्रिभुवन ,रवींद्र पाटील सुरेश बळसाने ,बिलाल शेख ,एकनाथ वाघ ,तेजराज निकम ,विक्की बारी ,आधी उपस्थित होते*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!