दि ठाणै डिस्ट्रीक को-ऑप-हौसिग फेडरेशनच्या कार्यालयाचे उदघाटन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ————————————————————-बदलापुर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-बदलापुर-अंबरनाथ मधील गृहनिर्माण संस्थांना कामकाजात मार्गदर्शन व मदत करण्याच्या उद्देशाने बदलापूर येथे दि ठाणे डीस्ट्रीक्ट को.ऑप-हौसिग फेडरेशनच्या नविन कार्यालयाचे उदघाटन रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी १०वाजता ४०३,तेलवणे टाॅवर,स्टेशन पाडा,मच्छी मार्केट समोर,बदलापूर(पूर्व)येथे आमदार श्री.किसनराव कथोरे आणि सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्थाचे(अंबरनाथ तालुका)श्री.चेतन चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.तसेच गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ही त्याच दिवशी काटदरे मंगल कार्यालय,बदलापुर पुर्व येथे सकाळी १०.३०वाजता करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास बदलापूर-अंबरनाथ येथील गृहनिर्माण संस्थांच्या सर्व पदाधिका-यांनी समस्त नागरीकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन दि ठाणे डीस्ट्रीक को-ऑप-हौसिग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे.
दि ठाणै डिस्ट्रीक को-ऑप-हौसिग फेडरेशनच्या कार्यालयाचे उदघाटन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
