*पोलिसांच्या गळाला बडे मासे लागेनात…* *कारवायांच अभिनंदन! मात्र बड्या मास्यांना जाळ्यात अटकून मोक्का अंतर्गत कारवाई करा…* *आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष दिनेश राज निकुंभ यांची मागणी….*धुळे जिल्ह्यात दर महिन्याला लाखोंचा गुटखा चोरट्या मार्गाने दाखल होतो. मध्यप्रदेश, यांसह आदी राज्यांमधून गुटखा व सुगंधी तंबाखूची तस्करी महाराष्ट्रात होते. धुळ्यामध्ये दाखल होणारा बहुतांश गुटख्याचा साठा ट्रॅव्हल्सव्दारे वाहतूक करून आणला जातो. त्यानंतर मोठ्या डिलरकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवला जातो. पोलिस गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना पकडतात, पण बडे मासे मात्र सहजासहजी गळाला लागत नाहीत. परराज्यातून गुटख्याची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश येथे मात्र बडे मासे हाती का लागत नाही? प्रश्न ही सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे….*पानठेल्यावर मिळतो सहजासहजी गुटखा :* पानठेल्यावर सहजासहजी मिळत असलेल्या गुटख्यावरून गुटखा बंदी आहे, असे कधी जाणवतही नाही. या पानठेल्यांवर कुठून गुटखा येतो. कोण आणून देतो. त्यांचे दलाल कोण हे शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत अन्न औषध प्रशासनाने कधी केला नाही. एकाही पानठेल्याची तपासणी या विभागाच्या नावावर नाही. गुटखा बंदी झाली तेव्हा पानठेल्यावाले कागदाच्या पुडीत गुटखा बांधून देत होते. आता तर तीही भीती नसल्याने खुलेआम गुटखा मिळत आहे…………… *कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे मागणी….*धुळे जिल्हात मध्यप्रदेश मधून गुटखा मागविणारे व धुळे जिल्हात सरासपणे प्रत्येक पान शॉप , किराणा शॉप , हॉटेल्स वर गुटखा पुरविणाऱ्या गुटखा किंग कोण याचा तपास लावून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्हा मधून गुटखा हद्दपार करा अशी मागणी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे जिल्हा अध्यक्ष दिनेश निकुंभ यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी केली होती तरी देखील लाखो रूपयांचा गुटखा तस्करी करताना पोलीस पकडून कारवाई करतांना दिसून येत असून पण पोलीसांच्या गळाला बडे मासे काही लागेनात असे म्हणायला हरकत नाही….धुळे शहरापासून मध्यप्रदेश व गुजरात या दोन्ही सीमा जवळ असल्यामुळे जिल्हात तस्करी चे प्रमाण वाढताना दिसून येते व त्या मुळे जिल्हात गुन्हेगारी चे प्रमाण वाढतांना दिसून येते धुळे जिल्ह्यात रोजगार कमी प्रमाणात असल्यामुळे नवयुवक कमी वयात वाईट मार्गाला लागतात, त्यांना कमी वयात तस्करी करून जास्त पैसा दिसायला लागला की ते गुन्हेगारी क्षेत्रात करीयर बनवू बघतात. महोदय आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात करोडो रूपयांचा गुटखा पकडून मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यात गुटखा , अवैध दारू मागविण्यात कोणात्या गुटखा किंग चा हात आहे. एवढा पैसा कोणता गुटखा किंग गुंतवणूक करतो याचा तपास करून ही कारवाई करावी अशी मागणी दिनेश राज निकुंभ सोबत सामान्य जनतेकडून केली जात आहे ……… महोदय येत्या काळात तरी आपण गुटखा किंग चा शोध घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई करून धुळे जिल्ह्यामधून गुटखा हद्दपार करणार का
*पोलिसांच्या गळाला बडे मासे लागेनात…* *कारवायांच अभिनंदन! मात्र बड्या मास्यांना जाळ्यात अटकून मोक्का अंतर्गत कारवाई करा…* *आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष दिनेश राज निकुंभ यांची मागणी.
