*प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत ची अटकेचा युवक काँग्रेस तर्फे निषेध* यावल : येथील रावेर यावल युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार विनंते यांना निवेदन देऊन युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली.युवक काँग्रेस वेळो वेळो सरकार चे हुकुमशाही विरोध लढादेत आहे असाच एक आंदोलन आमचे प्रदेश अध्यक्ष श्री कुणाल राउत साहेब यांनी काल दिनांक 4/02/2024 रोजी नागपूर येथे जिल्हा परिषेदेत ‘मोदी सरकार” एवजी भारत सरकार’ असा दुरुस्त करुन आपला निषेध नोधून जनतेत जनजागृती करणे चा काम केले आहे.ह्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली.केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे. हैं संविधान विरोधी आहे. पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे, ही अक्षाय चूक महाराष्ट्रभर युवक, शेतकरी, महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याविरोधात लेखी निवेदन दिले गेले. निषेधार्य आंदोलनं करण्यात आली. मात्र सरकार चूक दुरुस्त करायला तयार नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेसमोरील या जाहिरातीच्या बोर्डला काळे फासून आपला संताप व्यक्त केला. यामुळे विडलेल्या भाजपाच्या सत्ताधा-यांनी पोलिसांचा गैरवापर करुन आमच्या युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांना अटक केली आहे. कुणाल राऊत सातत्याने बेरोजगारी, महागाई, नोकर भरतीतील भ्रष्टाचार याविरोधात सत्यावर उतरून निषेध नोंदवत आहे. राज्यभरातील युवकांचा शिंदे- फडणवीस – पवार’ सरकारवरचा रोष युवक काँग्रेस, काँग्रेसच्या आंदोलनातून व्यक्त होतं आहे. हैं थांबवण्यासाठीची ही अटक आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रसंगी कुणाल राऊत आणि त्याच्या युवक कॉंग्रेस मधील सहकाऱ्यांसोबत आहे.अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक सरकारने केलेली ही अटक तानाशाही प्रवृतीची आहे. याचा मी तिव्र निषेध व्यक्त करतो. असून आमचे अध्यक्ष श्री कुणाल राउत यांना लवकरात लवकर सुटका करण्यात यावा नाही तर ह्याचा परिमाणात युवक काँग्रेस आक्रमक राहील आमचे वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शना स्थाली आम्ही आंदोलन करु ह्याची नोंध घ्यावे… अशी मागणी युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह व आदिल शेख यांनी केली
Related Posts
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची मागणीविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची मागणीविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी हेमकांत गायकवाड,(जळगांव जिल्हा सचिव…
मानव विकास पत्रकार संघ सोबतच साप्ता. दक्ष जळगांव पदाची कार्यकारणी जाहिर
*मानव विकास पत्रकार संघ सोबतच साप्ता. दक्ष जळगांव पदाची कार्यकारणी जाहिर* जळगाव : दि. ८ रोजी मानव विकास पत्रकार संघ…
जाफर अली यांची रावेर विधान सभा शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी निवड
*जाफर अली यांची रावेर विधान सभा शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी निवड* मा. मुख्यसमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आ.…