त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त दोंडाईचा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न**भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग यशात त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर* – *भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन

*त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त दोंडाईचा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न**भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग यशात त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर* – *भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन*दोंडाईचा-( दि.७/२/२०२४) त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दोंडाईचा येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी उपस्थित लोकनेते सरकारसाहेब रावल, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबुभाई पिंजारी, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ माणिक, माजी महिला व बालकल्याण सभापती भरतरी ठाकुर, माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, माजी पाणीपुरवठा सभापती किशन दोधेजा, ईशरत बानु शेख, माजी नगरसेवक खलील बागवान, ईश्वर धनगर, संदीप धनगर, कामगार युनियन अध्यक्ष रघुनाथ बैसाने, दीपक बाविस्कर, मक्कन माणिक, अनिल सिसोदिया, श्रीकांत सराफ, मनोज निकम, कैलास पवार, ईस्माइल पिंजारी, प्राचार्य संजय चंदने, महेंद्र बाबा कोळी, मनोहर कापुरे, दादाभाई कापुरे, फकीरा थोरात, रफिक शाह, सिद्धार्थ रामराजे, दिलीप माणिक, पिरण सुतारे, पप्पू सुतारे, इ मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले की रमाई यांचे आयुष्य बालपणापासून अत्यंत गरीबीतुन गेले म्हणून त्यांनी बाबासाहेबांना त्याच्या उच्चशिक्षणाच्या परदेशात पाठविताना घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत प्रसंगी रस्त्यावरील शेण गोळा करीत गोव-या बनवुन आपला उदरनिर्वाह करीत संसार केला बाबासाहेब व रमाबाई यांना पहिले अपत्य यशवंत यांच्या रुपाने झाले परंतु कायमस्वरूपी आजारी व अशक्त होते दुर्दैवाने पुढील ४ अपत्यापैकी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे वाचु शकली नाहीत परंतु बाबासाहेबांकडे कधी तक्रार केली नाही त्यांच्या उच्च शिक्षणात प्रपंचामुळे बाधा येऊ दिली नाही आपले संपूर्ण जीवन त्याग करीत बाबासाहेब यांच्या अध्ययनात अडथळा येऊ दिला नाही म्हणून बाबासाहेब यांना बँरिस्टर पदवी मिळुन विश्वातील श्रेष्ठ असे संविधान बाबासाहेब लिहु शकले असे प्रविण महाजन यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय बिरारे, मुकेश नगराळे, सचिन नगराळे, सागर नगराळे, रोहित नगराळे, दादा नगराळे, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र अहिरे यांनी केले तर आभार कृष्णा नगराळे यांनी मानले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!