विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी येथे विकासपर्व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्नपालकांच्या मागणीनुसार ग्रामीण भागात इंग्लिश मिडीयम स्कुल सुरु केली,प्रचंड प्रतिसाद पाहता येत्या काळात इंटरनॅशनल लेव्हलच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील पुढील वर्षापर्यंत नविन अद्यावत इमारत ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी संस्था कटीबद्ध आहे.श्री. मोतीलाल फकिरा पाटीलचेअरमन श.ता.को.ऑप एज्युकेशन सोसायटी.सौ.अश्विनी गणेश सुर्वे “विकासरत्न आयडियल टीचर अवार्ड 2023-24 च्या मानकरी”वडाळी प्रतिनिधी,दिनांक 8 फेब्रुवारी रोजी विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी येथे विकासपर्व बाल सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श. ता. को. ऑप एज्यूकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष वनश्री. तात्यासाहेब मोतीलाल फकिरा पाटील होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब श्री.साहेबरावगीर गोसावी होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विद्यमान संचालक श्री.प्रकाश पाटील गोसावी,संस्थेचे माजी संचालक दाजीसाहेब श्री.दत्तु नत्थू पाटील, संस्थेचे माजी संचालक श्री विठ्ठल नत्थू पाटील,संस्थेचे माजी संचालक श्री.गजेंद्रगीरी गोसावी,शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश माळी, केंद्रप्रमुख श्री.ज्ञानेश्वर इंदासराव,विकास हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री.सी.व्ही. चौधरी,लोकनियुक्त सरपंच वडाळी सौ.जयाताई ठाकरे, उपसरपंच श्री.अभय गोसावी,माजी सरपंच दिपकभाई पाटील,माजी पं.स.सदस्य श्री.गिरीषभाऊ जगताप, श्रीराम जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रतापभाई चव्हाण,सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना मोहिते,सौ.संध्याताई झाल्टे,से.नि.रेल्वे पोलीस उपनिरीक्षक श्री.एम.ए.रायसिंग जी.एस.विद्यामंदिर मुख्याध्यापक श्री.एस.डी.भोई,पर्यवेक्षक,व्ही. आर.पाटील,प्रकाशा युनिट प्राचार्य विजयकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश अहिरे, जेष्ठ शिक्षक श्री.पी.जी.पाटील, प्रा. एस.एच.वसावे, हे मान्यवर उपस्थित होते. विद्येचे दैवत सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली तसेच सन 2022 -23 मध्ये वार्षिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या गुणांचे कौतुक करण्यात आले मुंबई येथील युवा उद्योजक ऍड.श्री.संजय जगन्नाथ माळी यांनी दरवर्षी प्रमाणे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या संस्थेचे अध्यक्ष श्री.मोतीलाल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना विकास इंग्लिश मिडीयम स्कुल परिसरातीत एकमेव इंग्लिश मिडीयम स्कुल असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे येत्या काळात सुमारे 1 कोटी रुपये खर्चून अद्यावत इमारत उभी राहणार आहे इंटरनॅशनल स्तरावरील सर्व प्रकारच्या सुविधा वडाळी येथे उपलब्ध करून देऊ.पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कुल वर विश्वास दाखवला त्या बद्दल आभार व्यक्त केले अत्यंत सुंदर असे मनमोहक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी परिसरातील अनेक पालकांची मने जिंकली रामायण देखावा, हनुमान, शिवछत्रपती स्वराज्य,जेजुरीचे खंडेराव हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले तर पुष्पाराज,गोविंदा ट्रीब्युट,बापू सेहत के लिये या कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली नर्सरी ते 4th च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रेक्षकांची मने जिंकली प्रतिसाद देण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य श्री.चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर प्रास्ताविक आभार प्रदर्शन श्री.आर.डी.पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रियंका मॅडम,अश्विनी सुर्वे,सपना पाटील,चेतना पाटील,विशाखा शिंपी, निशिगंधा पाटील,यामिनी पाटील,रूपाली जगताप,चैताली पाटील, हेमलता पाटील,रुचीरा चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी भगवानभाई पाटील,विलास गवळे,भरत धनगर राकेश नेरपगार,राजेश गोसावी जीवन मोरे,कल्पना मोरे, कल्पना गोसावी, केदार कढरे यांनी प्रयत्न केले
Related Posts
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयासाठी धरणे- आंदोलन.
*मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयासाठी धरणे- आंदोलन. !* मुंबई (गुरुनाथ तिरपणकर)अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या…
नेर येथील डॉ.पंकज जाधव यांना पीएचडी प्रधान:
नेर: नेर येथील डॉ.पंकज जाधव यांना पीएचडी प्रधान: नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील डॉ.पंकज जाधव यांना पीएचडी प्रधान करण्यात आली…
अक्कलकुवा पंचायत समीतीचे कारभार वाऱ्यावर -ॲड. रुपसिंग वसावे
अक्कलकुवा पंचायत समीतीचे कारभार वाऱ्यावर -ॲड. रुपसिंग वसावे ————————————-अक्कलकुवा (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे…