*सिंचन विहिरी विषयी दीपक गिरासे यांनी पंचायत समितीची झोप उडवली. शेवटी पितळ उघडे पडलेच…* विहिरींचे जमा झालेले तीन हजार प्रस्तावातून दोन हजार प्रस्ताव गेले कुठ…?बातमी सविस्तर -शिंदखेडा तालुक्यातील अति महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे आज तरी शेतकऱ्यांचा सिंचन विहिरीचा आहे गेल्या काही दिवसापासून शिंदखेडा पंचायत समिती चा भोंगळ कारभार समोर आला आहे गेल्या ४ वर्षांमध्ये पंचायत समिती येथे तालुक्यातून सिंचन विहिरीचे तीन हजार प्रस्ताव जवळपास शेतकऱ्यांनी जमा झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे परंतु शेतकरी पुत्र दीपक गिरासे यांनी नुकत्याच गेल्या दोन हप्त्यामध्ये रखडलेल्या सिंचन विहिरींच्या बाबतीत रोखठोक आवाज उठवला त्याची सर्वच वृत्तपत्रात व सोशल मीडियात सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यात म्हणून तात्काळ पंचायत समितीच्या प्रांगणात मंडप टाकून राजकीय कारणामुळे दाबलेल्या तीन वर्षापासून सिंचन विहिरी शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या माध्यमातून एका दिवसात 266 सिंचन विहिरींच्या कार्यारंभ आदेशांचे वाटप करण्यात आले. परंतु इतर जमा प्रस्तावांचे काय? कोणत्या पात्रतेच्या व क्रमवारीच्या आधारावर कार्यारंभ आदेश देण्यात आले याचे उत्तर आजही पंचायत समितीकडे नाही. आतापर्यंत २६६ शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे वाटप केले हे शेतकरी म्हणून केले काही ठराविक गटाचे लोक म्हणून केले हा चर्चेचा विषय आहे कारण यातील काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती देतांना स्वतःच्या प्रोफाईल वरून ग्रामसेवकांच्या प्रोफाईल वर प्रस्तावातील माहिती गेली परंतु काही ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांच्या प्रोफाईल वर माहिती पाठवलीच नाही असे अनेक प्रस्ताव समोर आले आहेत आणि काही ग्रामसेवकांना स्वतःचा आयडी पासवर्ड माहीत नसतांना तरी त्या गावाचे विहिरींचे वर्क ऑर्डर कसे तयार झाले? अशी कोणती ऑनलाईन प्रणाली आहे की माहिती न देता वर्क ऑर्डर देते ? आणि त्या विहीर वाटप कार्य आदेश पण झालेत ? झालेला हा प्रकार चिंतनाचा जरूर आहे हे सर्व चित्र माहितीतून समोर आल्याशिवाय राहणार नाही. ज्या शेतकरींना विहरी मिळाल्या त्यांची यात चूक नाही व त्यांच्या बद्दल गैर पण नाही परंतु ज्यांनी वर्षांन वर्ष भरापासून प्रस्ताव देवून पंचायत समितीला चक्रा मारत होते त्यांच्या हाती काय असा प्रश्न पडत आहे. गावा गावातून काही शेतकरींकडून संबंधित कर्मचाऱ्याने लाखात रक्कम गोळा केली अशी चर्चा पण केली जात आहे व त्यात हात कोणी कोणी भरले हे तर घेणाऱ्याला माहिती पुढे खोल चौकशीतून समोर येईल, व त्याचे तसे काही मिळते जुळते कारणे पण दिसत आहे , तसे जरी नव्हते मग त्याची तात्काळ बदली का केली? व कशासाठी कोणी केली? हे तर मागचे कारण नाही की सिंचन विहिरींचे प्रस्तावांच्या O/C वर सह्या त्याच्याच होत्या म्हणून त्याला प्रत्येकाला सिंचन विहीर देण्यासाठी पर्याय शिल्लक नव्हता. त्यामुळे काही पुढाऱ्यांना मान्य नसावे त्यांना तर आपल्याच गटातील आपल्याच लोकांना विहिरी द्यायचे होते म्हणून तो कर्मचारी अडचणीचा ठरत असावा ? म्हणून त्याची बदली करण्याशिवाय पर्याय नव्हता हे या मागील सत्य असू शकते ? असा अंदाज समोर येत आहे हे सर्व गोष्टींचा बारकावे नुसार अभ्यास व माहिती घेवून दीपक गिरासे यांनी अचानक धाड टाकत पंचायत समितीच्या उपसभापती यांच्या केबिनचा दरवाजा बंद दिसल्यावर त्यांनी ठोकला आत काही चार पाच कर्मचारींचा आवाज येत होता काही वेळात त्यांनी दरवाजा उघडवला आत गेल्यावर प्रस्तावांची अंधाधुंद जुळवा जुळव चालू दिसली त्यावरून दीपक गिरासे यांनी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली असता हे काय सुरू आहे त्यावर त्यांनी सांगितले की काही सिंचन विहिरीच्या वर्क ऑर्डर झाले आहेत परंतु त्यांचे प्रस्ताव आम्हाला मिळत नाहीत व काही इतर येथे सापडत नाहीत ते शोधत आहोत मग त्याच्या वर्क ऑर्डर कशा दिल्या त्यावर त्यांनी उत्तर दिलेच नाही. आतापर्यंत तीन हजार प्रस्ताव जमा असताना येथे किती प्रस्ताव आहेत त्यावर त्यांनी सांगितले फक्त एक हजार प्रस्ताव मिळून आले आहेत तर मग बाकी प्रस्ताव गेले कुठ ? यावर कोणीच बोलायला तयार झाले नाही यावरून असे लक्षात येते की *टांगा पलटी घोडा फरार* हेच सत्य आहे. सर्व प्रकार गट विकास अधिकारी यांना गिरासे यांनी भ्रमणध्वनी ने कळविले असता त्यांनी त्यावर सांगितले की तुम्ही थोड समजून घ्या, शांतता राखा सर्व काही मार्ग शोधू, काही दिवस द्या होईल तेवढे प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देवून कार्य आदेश देवू फक्त झाले ते विसरा सर्वाँना विहीर देवू फक्त सहकार्य करा.असे काही चुकीचे होत असतांना वेळेवर प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे पंचायत समितीची झोप उडाली आहे, उर्वरित शेतकऱ्यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी १० दिवसाची मुदत दीपक गिरासे यांनी दिली आहे अन्यथा शेतकऱ्यांचा अनावर होईल मग त्याला जबाबदार प्रशासन राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
Related Posts
आचार्य अत्रे यांच्या १२५जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा. .
*आचार्य अत्रे यांच्या १२५जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा. .!* मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी)…
झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती
*नेर:* *झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती:* *नेर:* शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावात महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराच्या सभामंडपात…
समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न* समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा…