जयप्रकाश नारायण सूतगिरणी पॅनल प्रमुख श्री दिपक पुरुषोत्तम पाटील शेल्टी गावाला भेटी नंतर शेतकरी यांची नाराजगी*

*जयप्रकाश नारायण सूतगिरणी पॅनल प्रमुख श्री दिपक पुरुषोत्तम पाटील शेल्टी गावाला भेटी नंतर शेतकरी यांची नाराजगी*

प्रतिनिधि =उमाकांत पाटील

.*शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे जयप्रकाश नारायण सूतगिरणी उंटावद होळ तालुका शहादा निवडणूक प्रचार निमित्त सूतगिरणी पॅनल प्रमुख व मा.सातपुडा साखर कारखाना चेअरमन व गुजर समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिपक पुरषोत्तम पाटील हे शेल्टी गावातील सूतगिरणी सभासद व शेतकरी यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर शेल्टी येथील रहिवाशी नंदुरबार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व शेल्टी विविध कार्यकारी संचालक श्री. ईश्वर भुता पाटील, शहादा माजी खरेदी विक्री चेअरमन, शेल्टी विविध कार्यकारी संचालक श्री.राजाराम तुकाराम पाटील श्री. के. डी. पाटील, गावाचे मा. सरपंच श्री. आनंदा गुमान सावळे,मा. पोलीस पाटील श्री भगवान शिंदे व राम मंदिर प्रमुख श्री. मोहन भबुता पाटील हे होते. यावेळी दहा ते पंधरा शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम साठी सातपुडा साखर कारखान्याचे आता नागाई शुगर कारखाना नाव झाले आहे. त्या कारखान्याचे पेमेंट अदयाप मिळाले नाही. म्हणून शेल्टी गावातील शेतकरी श्री. छोटूलाल गुमान सावळे माध्यमिक विदयालय मुख्याध्यापक, श्री. वसंत रामदास पाटील, श्री. मोहन भबुता पाटील,श्री. जगतसिंग गिरासे,श्री. युवराज सावळे, श्री.अनिल गोरख ( शिवदास )पाटील, श्री. रवींद्र बन्सीलाल पाटील यांच्यासह अनेक शेतकरी यांनी आधी नागाई साखर कारखाना येथे दिलेल्या ऊसाचे व जयप्रकाश नारायण सूतगिरणी येथे दिलेल्या कापसाचे पैसे द्या. म्हणून गावातील शेतकरी यांनी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर बसलेले खरेदी विक्री चेअरमन श्री.राजाराम तुकाराम पाटील मात्र त्यांनी शेतकरी यांच्या समोर एक शब्दाने सुद्धा शेतकरी यांची बाजू मांडली नाही व नंदुरबार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. ईश्वर भुता पाटील हे देखील गावातील शेतकरी यांची बाजू न मांडता गप्प बसून होते. सदर कार्यक्रम साठी शेल्टी येथील रहिवाशी व जयप्रकाश नारायण सूतगिरणी माजी संचालक व भाजपा शेल्टी गण पंचायत समिती सदस्य श्री किशोर छोटूलाल पाटील यांची अनुपस्थिती होती. श्री किशोर छोटूलाल पाटील यांनी काही शेतकरी यांना फोन लावून उपस्थित राहण्यासाठी सांगितले व ते स्वतः उपस्थित न राहिल्याने गावात चर्चेचा विषय झाला आहे.शेतकरी यांचे मत जाणून घेतल्या नंतर देखील गुजर समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिपक पुरुषोत्तम पाटील यांनी ठोस आश्वासन दिले नाही. किंवा पेमेंट चि खात्री देखील दिली नाही. जयप्रकाश नारायण सूतगिरणी चे पेमेंट देखील खूप साऱ्या शेतकरी यांचे बाकी म्हणून श्री. दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या कामाबद्दल शेल्टी येथील शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेल्टी येथील जनतेचा आक्रोश लक्षात घेता पुन्हा शेल्टी गावात येणार नाही असं जाता जाता शेतकरी यांच्या समोर श्री. दिपक पुरुषोत्तम पाटील बोलून गेले. या सर्व प्रकार बाबत शेल्टी गावात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. शेल्टी गावातील नंदुरबार जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री ईश्वर भुता पाटील, खरेदी विक्री चेअरमन श्री. राजाराम तुकाराम पाटील, व जयप्रकाश नारायण सूतगिरणी संचालक व भाजपा पंचायत समिती शेल्टी गण सदस्य श्री.किशोर छोटूलाल पाटील हे गावातील शेतकरी यांची बाजू मांडत नसल्याने त्यांना विविध ठिकाणी निवडून देणारे किंवा विविध पदावर बसवणाऱ्या नेत्या बाबत देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून निवडणुकीत नंदुरबार जिल्हा मधील आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या पॅनल कडून श्री ईश्वर भुता पाटील निवडणूक लढले होते व श्री दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या पॅनल विरोधात लढणारे आज सर्व तालुक्यातील विविध ठिकाणी एकमेकांच्या बाजूला खुर्ची टाकून बसतांना दिसत आहेत मंत्री गावित साहेब यांचं शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पॅनल मुद्दाम उभं केलं होत कि काय ❓याबाबत देखील चर्चा होत आहेत हे सर्व होत असतांना आदिवासी विकास मंत्री डॉ श्री विजयकुमार गावित साहेब यांची जणू नंदुरबार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री ईश्वर भुता पाटील हे दिशाभूल तर नाही करत आहे ❓अशी देखील चर्चा होत आहे .*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!