महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथील ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत धनराज सूर्यवंशी कडून जीवे ठारमारण्याची धमकी….सविस्तर :- शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर गावांत ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले संदिप निकम हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असतांना दि12/02/2024 रोजी सकाळी 11/54 वाजेच्या दरम्यान महाळपुर गावांतील धनराज काशिनाथ सूर्यवंशी यांनी काहीएक कारण नसतांना संदिप निकम यांच्यावर खुर्ची टाकली तसेच , मागील भांडणाचे कुरापत काढून वाईट वाईट शिवीगाळ करून संदिप निकम यांच्या शर्टाची कॉलर पकडून हाताबुक्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मी माझे काम करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. असे ग्रामरोजगार सेवक संदीप निकम यांना समक्ष सांगितले आहे .
ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत धनराज सूर्यवंशी कडून जीवे ठारमारण्याची धमकी
