माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी*

*माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी*प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा : दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर सर यांचे आदेशानुसार तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन सर यांचे नेतूत्वखाली नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी तर्फे मा. निवासी उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब, उप मुख्यमंत्री, तसेच पोलीस महासंचालक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले, धमक्या, मारहाण व खून/हत्या इत्यादी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सुरक्षा निश्चित होईल असे शासनाने ठोस धोरण जाहीर करावे व ते काटेकोरपणे अंमलात आणावे, इतर विषया बाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्राचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र भोई नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सईद कुरेशी, नवापूर प्रचार संयोजक संदीप कोकणी, जाकिर शेख, छबिलाल गांगुर्डे योगेश वळवी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!