भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून टाकरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता सौ.अनिता ताई गिरासे यांची स्वेच्छा मरणाची मागणी

*भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून टाकरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता सौ.अनिता ताई गिरासे यांची स्वेच्छा मरणाची मागणी* ✍️✍️. *नाशिक विभागीय आयुक्त मा.श्री राधाकृष्ण गमे यांच्या जवळ केली अर्जाद्वारे मागणी* – भ्रष्टाचार हा मानवी जातीला लागलेला एक प्रकारचा किळ आहे. भ्रष्टाचार म्हटले की सामान्य माणसाला जगु न देणारा व त्यांच्यापासून सत्ता संपत्ती पैसा हिरावून घेणारा एक जिवंत राक्षसच म्हणावा भारतीय समाजात भ्रष्टाचाराची मूलभूत स्थापना संधी साधू नेत्यांपासून सुरू झाली जे लोकं योग्य तत्वावर कार्य करतात , त्यांना आधुनिक समाजात मान्यता नसते व मूर्ख ठरवले जाते. राजकारणी पासून सुरू झालेला भ्रष्टाचार हा भारतीय नोकरशाही त्यात मग अगदी खालच्या स्तरावरील सरकारी कर्मचारी पासून सुरूवात होते.आजच्या परिस्थितीत टाकरखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या मा.अनिता ताई गिरासे यांना भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवल्यानंतर भयंकर असा नाहक त्रास दिला जात आहे . खोटे गुन्हे नोंद करून तुम्ही एक लढवय्या स्त्री चे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेवटी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्जद्वारे स्वेच्छा मरणाची मागणी केली. तक्रारीत नमूद केले आहे की मा.महोदय आपणास सांगू इच्छिते की बराच वर्षापासून टाकरखेडा इमारत बांधकाम विषयी तक्रार केली असून त्याच्या पाठपुरा करून देखील कारवाई मात्र होत नाही बरीच वर्ष होऊनही कारवाई होत नसेल तर याला काय म्हणावे गावात 40-45 लाखाची इमारतीची बांधकाम केले आहे आरटीआय मध्ये विचारण्यात केली असता ग्रामसेवकांनी लोकवर्गणीतून केले आहे अशी माहिती दिली बाकी त्याला काही माहीत नाही असे त्यावेळेस ग्रामसेवक म्हणतो. इतकी मोठी वास्तू व त्यासाठी लागणारा पैसा साहित्य सहज उपलब्ध नसते ते कुठून उपलब्ध झाले याची देखील माहिती ग्रामसेवकाने दप्तरी ठेवली पाहिजे होती ती न ठेवणे म्हणजे ग्रामसेवकाची आर्थिक संबंध जोपासले गेले असतील म्हणून बांधकाम करत असताना ग्रामसेवक ने बघायची भूमिका बजावली आहे.इतकी मोठी इमारत बद्दल चौकशी केली असता माझ्यासमोर बांधली गेली पण मला त्याबद्दल माहिती नाही याबाबत अनेक तक्रारी करून देखील कायदेशीर व सत्य परिस्थिती समोर येत नाही चौकशी केली जात नाही याबाबत मला न्याय मिळत नाही तरी तो देण्याच्या कष्ट करावे ही नम्र विनंती *तक्रार दुसरी* बारा तेरा वर्षी अगोदर मंजूर झालेली 40/ 44 लाखाची पाणी योजना धुळखात पडली आहे .40/44 लाखाची योजना पण 40 थेंब सुद्धा पाणी निघाले नाही ही योजना अपूर्ण पडली आहे .तिची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे.वारवांर तक्रार देऊन कारवाई केली जात नाही *तक्रार तिसरी* उपसरपंच चे अतिक्रमण त्यांच्या 7/12 आहे तो मोजून अतिक्रमण काढणे , वेळोवेळी सुनावणी घेऊन ही आजपर्यंत निर्णय न देणे , तक्रारदाराला हेलपाट्या मारायला लावून मानसिक व शारीरिक त्रास देणे हा मूळ हेतू दिसतो. माझ्या कायदेशीर तक्रारीनंतर देखील आजपर्यंत काही निष्पन्न झाले नाही माझ्या कायदेशीर आणि भ्रष्टाचार विरोधी तक्रारीकडे लक्ष न देणे दुर्लक्षित करणे असा प्रकार सातत्याने होत आहे. निष्कृष्ट दर्जाचे काम लेखापरीक्षणावर मध्ये अनियमित त्रुटी खोट्या सही करून चौकशी अहवाल पाठवून माझी फसवणूक केली आहे. याबाबची तक्रार सीईओ यांना केली आहे परंतु जैसे थे परिस्थिती आहे. उलट मला त्रास देऊन माझे भ्रष्टाचार व अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.मा.उपसरपंच यांनी त्यांच्या राहत्या घरात गळाफास लावून आत्महत्या केली होती. की कोणी लावून दिली होती अशी परिस्थिती असतानां माझ्यावर आणि माझे पती ,जेट जे 85 वर्षाची म्हातारे आणि त्यांच्या नातू आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले . माहितीच्या अधिकारात माहिती मागणी ग्रामपंचायत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणे , अर्ज करणे हा कायद्याने गुन्हा आहे का ? माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अशा पद्धतीने भ्रष्ट व दूषित हेतूने गुन्हे दाखल करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मी या स्वतंत्र भारताचे नागरिक असून मी कर स्वरूपात पैसे भरते त्यामुळे माझ्या व जनतेच्या पैसा कोणत्या कामाला किती व कसा खर्च झाला हा मला विचारण्याच्या पूर्ण अधिकार संविधानाने, लोकशाहीने दिलेला आहे तो माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .माहितीच्या अधिकाऱ्याचे अर्ज व तक्रारी अर्ज मी व्यक्तिगत स्वरूपात केली असून माझ्या परिवाराच्या यात काही संबंध नसताना त्यांना देखील मानसिक त्रास होत आहे . मी या अर्जाद्वारे अंतिम स्वरूपात सांगू इच्छिते की मला न्याय देऊ शकत नसाल , माझ्या तक्रारीचे निरीक्षण करून भ्रष्टाचारी , गुन्हेगारांवर कारवाई केली जात नसेल तर मला स्वेच्छा मरण्याची परवानगी मिळावी. भ्रष्टाचारांना समर्थन करणारी शासकीय व्यवस्था राजकीय गुन्हेगारांना पाठीशी घालणारी भ्रष्ट निती आणि गुन्हेगारानां समर्थन करणारी नीच वृत्ती याविरुद्ध मी अतिशय त्रस्त झाले आहे. रोज मरण यातना सहन करण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे म्हणून मला स्वेच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी ही नम्र विनंती सदरील तक्रार ही पोलिस आयुक्त नाशिक , जिल्हाधिकारी , सीईओ , पोलिस अधीक्षक यांना समक्ष भेटून अर्जाद्वारे देण्यात आली आहे. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!