*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न

*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न**माजी सैनिक सुभाष गणपत पावरा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न* तलोदा येथील समाजकार्य महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजनेअन्तर्ग धवलीविहिर येथे 7 दिवसीय निवासी विशेष हिवाली श्रमसंस्कार शिबिर चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले सदर शिबिर हे 16 फेब्रूवारी ते 22 फेब्रूवारी दरम्यान असणार आहे शिबिराचे उद्घाटन निमित्त गावाचे सरपंच सपनाताई वसावे, ग्रामविस्तार अधिकार श्री मुकेश कापुरे, दारासिंह वसावे, अमृतसिंग पावरा, शेवन्ती ताईं ठाकरे, जितेंद्र खवले ,समाजकार्य महाविद्यालय चे प्राचार्य उषा भीमसिंह वसावे , उपस्थित होतेसदर शिबिराचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र शंकरसिंग यांनी केलें यात त्यांनी सांगितले की शिबिर अंतर्गत सक्षम युवा समर्थ भारत या थीम अन्तर्गत विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे यात युवक यांच्या विकासात रासेयो ची भूमिका, आपली।संस्कृति आपला बाना, राष्ट्र उभारनित युवकांची भूमिका, अंधश्रद्धा निर्मूलन आणि युवकांची भूमिका, बालविवाह कायदा, आपती व्यवस्थापन, सक्षम युवा समर्थ भारत, स्पर्धा परीक्षा आणि युवक, पंचप्रण,आदि विषयावर मार्गदर्शन शिबीर चे आयोजन करण्यात आलेले असून सोबत रक्तदान शिविर, पशुचिकिस्ता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड लिंक शिबिर, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड शिबिर चे आयोजन ही करण्यात आलेले आहे अस आपले प्रस्ताविक स्पष्ट केलेग्रामविस्तार अधिकारी श्री मुकेश कापुरे यांनी युवकांची भूमिका आणि रासेयो शिबिर याबद्दल मार्गदर्शन केले , अमृतसिंग पावरा यांनी गावात आपणास शिबिर चा माध्यमाने कोणते काम करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले, प्राचार्य उषा भीमसिंह वसावे यांनी शिबिर मधे स्वयंसेवक यांनी गावातील लोकांचे समस्या काश्या शोधले पाहिजे आणि त्यांचे नियोजन कशे केले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले कार्यक्रमचे आभार प्रदर्शन प्रा नीलेश गायकवाड़ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!