*शेल्टी तालुका शहादा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत पाटील यांच्या मदतीने चि. महेश दौलत कोळी याचा वेळीच उपचार.* *प्रतापपूर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथील चि. महेश दौलत कोळी हा 12 वित शिकणारा तरुण अचानक 13 दिवस पहिले आजारी पडला आधी थंडी ताप येत होता. अचानक काही दिवसानंतर छातीत दुखायला लागले किरकोळ उपचार करत बरं वाटत होत. पाच ते सहा दिवस पासून जेवण बंद झालं घसा दुखू लागला म्हणून शहादा येथील कृष्णा हॉस्पिटल चे कान नाक घसा डॉ. यांच्या कडे नेलं त्यांनी छातीचा क्ष किरण काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर छातीची एका बाजूला पाणी असण्याचा तेथील डॉ यांनी सांगितलं त्यानंतर चि. महेश कोळी ला त्याची आई बहीण पाहुणे यांनी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल ला आणले आहे . शेल्टी गावातील श्री. जितेंद्र रवींद्र पाटील यांनी शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत शिवाजी पाटील यांना दिनांक 15/02 /2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता फोन द्वारे सांगितलं. श्री. उमाकांत पाटील हे मुंबई ला होते ते लगेचच तेथून पूर्ण रात्रभर प्रवास नंतर घरी आले.दिनांक 16/02/2024 रोजी सकाळी 10:00 वाजता आपला मित्र श्री जितेंद्र पाटील ला घेऊन दवाखान्यात गेल्या नंतर पेशंट ला ICU ला भेट नंतर छातीत जास्त दुखत असल्याच माहित झालं.5 ते 6 दिवसापासून जेवत नसल्याचं माहित झालं. सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत पाटील यांनी तेथील परिचारिका यांची भेट घेऊन छातीत असलेल्या पाणी काढण्यासाठी डॉ बोलवा म्हणून सांगितलं डॉ नाहीत सध्या म्हणून माहित झालं. श्री. उमाकांत पाटील यांनी सिव्हील हॉस्पिटल येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे मुख्य अधिष्ठाता ( DIN ) डॉ श्री. अरुण हुमणे यांची प्रत्येक्ष भेट घेऊन पेशंट चे छातीत असलेले पाणी तात्काळ काढून उपचार करण्याची विनंती केली.त्यांच म्हणणं ऐकून डॉ यांनी लागलीच पेशंट उपचार होईल सांगत आपली यंत्रणा कामाला लावली. व दवाखान्यातील सर्जन डॉ चेतन सूर्यवंशी यांनी 4:30 वाजता पेशंट ला सर्जरी साठी बोलावले.सर्जरी नंतर छातीतून एक तासात 1 लिटर इतका पल्स निघाला. नंतर डॉ. यांनी छातीचा ( X ray )क्ष किरण साठी सांगितलं. सिव्हिल हॉस्पिटल येथे ( X-ray )मशीन बंद होते. पेशंट ला रात्री 9:00 वाजता बाहेरून ( X-ray )काढण्यासाठी श्री उमाकांत पाटील घेऊन गेले. त्या नंतर त्या चि. महेश कोळी ला निमोनिया असल्याच माहित झालं. चि. महेश कोळी यांचा सामाजिक कार्यकर्ते श्री उमाकांत पाटील यांच्या सांगितल्याने वेळीच उपचार झाल्याने व पेशंट हा समाजाचा नाही किंवा नातेवाईक नाही असा कोणताही जातीभेद मनात ठेवता एक माणुसकी हाच धर्म पाळला.पेशंट साठी दवाखान्यात पूर्ण दिवस राहून जी मदत केली ती कधी विसरण्यासारखी आहे . म्हणून पेशंट चे नातेवाईक आई,आजोबा, बहीण, पाहुणे यांनी समाधान व्यक्त केले आहे . दिनांक 16/02/2024 रोजी नवागावं तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील उमाकांत पाटील यांचे मित्र शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक उमेदवार चि. विलास पावरा याच लग्न होते. व शेल्टी तालुका शहादा गावातील चि. पंकज सुदाम कोळी याची हळद होती. या दोन्ही ठिकाणी न उपस्थित राहता वेळीच चि. महेश कोळी चा उपचार करून घेण्यासाठी महत्व दिलं म्हणून श्री. उमाकांत पाटील यांचं सर्व जण कौतुक करत आहेत. यावेळी डॉ. विलास पराडके, परिचारिका सौ. वळवी, शेल्टी येथील श्री. जितेंद्र पाटील नंदुरबार येथील चि. भैय्या सावंत यांची मदत झाली .*
Related Posts
गो -मय बीज राखी महाराष्ट्रभर ; महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम
गो -मय बीज राखी महाराष्ट्रभर ; महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम महा एनजीओ फेडरेशन द्वारा महाराष्ट्रातील १०० ठिकाणी १०० सामाजिक…
22 एप्रिल साठी नंदुरबार शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुकीत अंशत: बदल
22 एप्रिल साठी नंदुरबार शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुकीत अंशत: बदलनंदुरबार,दिनांक.20 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार शहरात शनिवार 22 एप्रिल,…
चैताली ने फिर एक कोब्रा साप को दिया जीवनदान
*चैताली ने फिर एक कोब्रा साप को दिया जीवनदान*दोपहर के करिब २:३० बजे फॉर्चून एम्पायर अपार्टमेंट , बेलतरोड़ी अपार्टमेंट के…