एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ तर्फे अप्पर तहसीलदार व दोंडाईचा पोलीस निरीक्षकांना देऊन आरोपी लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यां बाबत निवेदन देऊन केली मागणी

*एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ तर्फे अप्पर तहसीलदार व दोंडाईचा पोलीस निरीक्षकांना देऊन आरोपी लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यां बाबत निवेदन देऊन केली मागणी*दोंडाईचा प्रतिनिधी दोंडाईचा, शिंदखेडा तालुक्यात विरदेल येथे ११.०२.२४ रोजी घडलेले घटना १४ वर्षे मुलीवर अत्याच्यांर झालेला आहे ती अत्यंत निंदनीय आहे तरी याचा तपास आपली पोलीस यंत्रणा करीत आहे त्याच्यात अजूनही कोणत्याही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही ही घटना घडण्याअगोदर चिमुकली चे आई- वडिलांना फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता तरी या शिंदखेडा पोलीस स्टेशन मार्फत यांना अनेक उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले होते. जर आज पोलीस प्रशासन पहिल्या दिवसापासून आपलं काम एकनिष्ठपणे व प्रामाणिक केले असते तरी या मुलींच्या जीव कदाचित गेला नसता तरी संपूर्ण आदिवासी समाजाची नाराजगी आपल्या पोलीस यंत्रणावर आहे या पुढे या प्रकरणाची सकोल चौकशी व उच्च दर्जाची यंत्रणा वापरत या प्रकरणाची शा निशा लवकरात लवकर करावी तसेच या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळेल लवकरात लवकर योग्य तो आरोपी सापडेल व त्याला योग्य ती व लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा आपल्या पोलीस प्रशासना कडून बाळगतो तसेच तसेच हा खटला स्पीड व विशेष कोर्टात चालून आरोपीला फाशीच देण्यात यावी व यापुढे कोणत्याही प्रकारे हलगर्जी पणा करण्यात आला होता. व येत्या ६ ते ७ दिवसात खऱ्या आरोपीला अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभरात जन आंदोलन केले जाईल. तरी आशा अनेक घटना व अन्याय अत्याचार महाराष्ट्रभरात आदिवासी समाजावर होत आहे तरी याच्यां साठीही पोलीस यंत्रणा सक्षम व्हावी आपल्याकडे आलेला आदिवासी समाज याला एक योग्य तीच वागणूक द्यावी अशी विनंती अन्यथा आदिवासी समाजाच्या पोलीस प्रशासनावरून विश्वास उटेल व कायदा हातात घेण्यास हा समाज मागे हटनार नाही यावेळी आदिवासी एकता परिषद, भारत टायगर फोर्स, युवक काँग्रेस प्रदेश सचिव,राष्ट्रवादी काँग्रेस महिला ,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व समाजातील विविध राजकीय पक्षाचे संघटनांनी हा मोर्चा ला आपला पाठिंबा दिला होता. घटना यापुढे आदिवासी समाजावर नव्हे तर इतर कोणत्याही समाजावर घडू नये अशी मागणी या निवेदनात नमुद केली आहे. यावेळी युवराज सोनवणे, संस्थापकध्यक्ष, एकलव्य भिल्ल जनसेवा, रविभाऊ जाधव प्रदेशाध्यक्ष एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ , पुजा ताई खडसे महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अनिता ताई देशमुख शिंदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अंकुश नाईक जिल्हाध्यक्ष आदिवासी एकलव्य भिल्ल जनसेवा ,देविदास मोरे जिल्हा उपाध्यक्ष एकलव्य भिल्ल जनसेवा विष्णु ईशी तालुकाध्यक्ष एकलव्य भिल्ल जनसेवा अर्जुन मालचे, तालुका उपाध्यक्ष एकलव्य भिल्ल जनसेवा मनिष जाधव नगरसेविका दोंडाईचा, सपना सोनवणे सुलवाडे, रेखा ठाकरे , नर्मदाबाई ठाकरे लतिबाई सोनवणे व आदिवासी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!