आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण;लड्डू पाटील व सहका-यांवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल**आरोपींना अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी*

*आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण;लड्डू पाटील व सहका-यांवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल**आरोपींना अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी*शहादा:शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ५-६ आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली,मारहाणीत मुलांचे कपडे फाटले व जबर दुखापत झाली. मुलांना ग्रामीण रूग्णालय शहादा येथे तपासणीला पाठविण्यात आले.सदर घटना दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली.पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते,नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)5(A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार बादल ठाकरे वय १९ रा. औरंगपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,आदिवासी एकता परिषदचे दिपक ठाकरे,जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पावरा,ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल सुळे,औरंगपूरचे सरपंच एकनाश वळवी ,उपसरपंच आनंद शेवाळे, ईकू पवार,भीलीस्तान टायगर सेनेचे सतीश ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते तथा नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा,सामाजिक कार्यकर्त्या कांतीबाई पवार, मिराबाई शेवाळे, भुरीबाई ठाकरे सह हजारों महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते. घटनेची चौकशी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करीत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करावी,अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत, असा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!