*आचार संहिता आधी ४० कोटी रकमेतून तालुक्यातील १००० शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश मिळणार… दीपक गिरासे*
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी
शिंदखेडा तालुक्यातील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर सिंचन विहिरींचे सर्व प्रकरण आपण पाहिले गेली दोन वर्षांमध्ये तालुक्यातील सर्व सिंचन विहिरी रखडलेले असताना यावर कुठल्याही नेत्यांनी लक्ष केंद्रित केले नाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये विहिरींचे काम पूर्णत्वास आले परंतु शिंदखेडा तालुका हा जास्त दुष्काळी परिस्थिती असताना देखील यावर कोणीच पाठपुरावा करायला पुढे आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी खूप लांबल्यात यात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे ही मोठी शोकांतिका आहे. आचार संहिता आदी सर्वच शेतकऱ्यांना विहिरी मिळाव्यात यासाठी दीपक गिरासे यांनी सतत पाठपुरावा करत प्रशासनाकडून सिंचन विहिरीचे दाबलेले प्रकरण मैदानात आणले त्यामुळे आता सिंचन विहिरी आचारसंहितेच्या आधी १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना काम चालू करण्यासाठी कार्यारंभ आदेश पंचायत समितीकडून मिळतील अशी माहिती दीपक गिरासे यांनी दिली. जिल्हा परिषद धुळे येथे काल झालेल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याशी प्रत्यक्ष भेट करून तालुक्यातील सर्व परिस्थिती दीपक गिरासे यांनी मांडली व त्यांना शेतकऱ्यांचे होणारे नुकसानाचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे तात्काळ जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिंदखेडा गटविकास अधिकारी वाघ साहेब यांना कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भात कामाला वेग देण्याचे आदेश दिलेत म्हणून दीपक गिरासे यांच्या पाठपुरामुळे रखडलेल्या दोन वर्षापासून विहिरी आता शेतकऱ्यांना मिळतील यात शंका नाही. शिंदखेडा पंचायत समितीचे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची यामुळे पळापळ सुरू झालेली दिसून आली आहे. यावेळी भेटी दरम्यान त्यांच्यासोबत देवी गावाचे माजी सरपंच चिंधा गुमानसिंग गिरासे हे उपस्थित होते.