*दोंडाईचा उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक व कर्मचारी यांच्याकडून वयाच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांची गैरसोय*

*दोंडाईचा उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक व कर्मचारी यांच्याकडून वयाच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांची गैरसोय*✍️✍️ रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे दोंडाईचा परिसरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना हे ब्रीद वाक्य शोभत नाही. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य तो सन्मान मिळावा, त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठांच्या सन्मानार्थ १ ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘ज्येष्ठ नागरिक दिवस’ म्हणून साजरा केला जातो.गेल्या काही आठवड्यांपासून दोंडाईचा शहर आणि परिसरातील खेडेगावातून जेष्ठ नागरिक विविध योजनांसाठी लागणाऱ्या वयाच्या दाखल्यासाठी वैद्यकीय अधीक्षक दोंडाईचा उप जिल्हा रूग्णालय यांच्याकडे हेलपाटे घालत असून वयोवृद्ध आणि अशिक्षित व अल्पशिक्षीत नागरिकांची रूग्णालयाचे अधीक्षक व कर्मचारी यांच्याकडून दिशाभूल केली जात असून एका खोलीतून दुसर्‍या खोलीत फिरविले जाते कधी दुपारी चार वाजेपर्यंत थांबायला सांगीतले जाते आणि तरीही दाखला दिला जात नाही यामुळे जेष्ठ नागरिकांमधे कमालीचा असंतोष दिसून येत आहे. कोणतेही शिबिर किंवा आरोग्य दिवस असू द्या हे डॉक्टर व स्टाफ टाईमावर येतात इतर दिवशी मात्र दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा शुकशुकाट असतो.अहो ड्युटी नाही करता येत तर राजीनामा द्यावा कशाला सर्वसामान्य जनतेला वेठीस धरता खाजगी दवाखाने आहेत ना तुमचे मग तिथे तर अव्वा चे सव्वा कमवत आहात ना…मा. धुळे जिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांना विनंती आहे दोंडाईचेतील स्थानिक डॉक्टरानां दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचा चार्ज देऊ नका नाहीतर ते आपल्या खाजगी दवाखाण्यात जास्त लक्ष देता व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कमी याला लोकप्रतिनिधी ही तेव्हढेच जबाबदार आहेत.मी विनंती करतो मा. वर्ग 1 वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलकर्णी साहेबांना त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी आणि जिल्हास्तरीय वरिष्ठांनी लक्ष घालून जेष्ठ नागरिकांची होणारी फरपट थांबविली पाहीजे अशी मागणी पुढे येत आहे. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!